शेतीमाल व्यापार सुधारासंबंधी पारित केलेल्या अध्यादेशांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा; समर्थनासाठी जिल्हात तहसीलदारांमार्फत निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी |गजानन घुंबरे

केंद्र शासनाने शेतीमाल व्यापार सुधारासंबंधी पारित केलेल्या अध्यादेशांना परभणीत शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. सरकारने , काही संघटना व पक्षांच्या दबावाला बळी पडुन खुलीकरणाचा निर्णय मागे न घेण्यासाठी आज जिल्हात ठिकठिकाणी तहसीलदार यांना समर्थनाचे निवेदन शेतकरी संघटनेच्या तालूकाध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी दिले आहे.

केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने शेत माल व्यापार , व्यवस्था , सुधारना संबंधी तिन आदेश यावर्षी ५ जुन रोजी पारीत केले आहेत . कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी संपविणे , ऑनलाईन शेतमाल , व्यापाराव्दारे एक देश एक बाजार व्यवस्था निर्माण करणे , आवश्यक वस्तु कायद्यातुन प्रमुख शेतमाल वगळणे , करार शेतीला प्रोत्साहन देणे हे निर्णय शेतीव्यवसायाच्या फायद्याचे आहेत असे शेतकरी संघटनेचे म्हणने आहे.

गेली ४० वर्ष शेतकरी संघटनेची ही मागणी होती ती प्रत्यक्षात साकार केल्याबद्दल शेतक – यांच्या वतिने केंद्र शासनाचे आभार मानत आहोत असेही निवेदनात म्हटले आहे . दि . २४ ऑगस्ट रोजी शेतकरी संघटनेचे पाथरी तालूकाध्यक्ष त्र्यंबक घुंबरे यांनी दिलेल्या निवेदनावर संघटनेचे जयराम नवले, बळीराम नागरगोजे, अनिल माने, जनार्दन घुंबरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.