मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बाप आणि लेकीचे एक विशेष नाते असते. त्यांच्यातील प्रेम शब्दात व्यक्त करता येत नाही. आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी वडील काहीही करण्यास तयार असतो. असाच एका बाप आणि लेकीच्या प्रेमाची गोष्ट सांगणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक अपंग बाप आपल्या मुलांना शाळेत सोडायला जाताना दिसत आहे. तो कोणत्या गाडीतून नाहीतर ट्रायसायकलवरून आपल्या लेकीला शाळेत सोडायला जात आहे. लहान मुलगा आपल्या वडिलांच्या मांडीवर बसलाय तर मोठी मुलगी ट्रायसायकलच्या मागच्या बाजूला बसली आहे.
पिता 🙏🏻 💕 pic.twitter.com/w3buFI6BpR
— Sonal Goel IAS 🇮🇳 (@sonalgoelias) May 23, 2022
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ट्राय सायकल रस्त्यावरून जाताना दिसत आहे. त्याच्या मागे एक सीट आहे, ज्यावर शाळेचा गणवेश घातलेली एक मुलगी बसलेली दिसत आहे. हा व्हीडिओ मागच्या बाजूने सुरू होतो. नंतर तो पुढे-पुढे जातो. ही व्यक्ती ट्राय सायकल चालवत आहे आणि त्याच्या मांडीवर एक मुलगाही दिसत आहे. या दोन चिमुकल्यांना घेऊन ही व्यक्ती ट्रायसायकलवरून जाताना दिसत आहे. यावरून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी एका अपंग बापाचा संघर्ष दिसत आहे.
या वडिलांच्या संघर्षाचा व्हिडिओ आयएएस सोनल गोयल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला पिता असे कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर सोळा हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे पण वाचा :
दोन महिलांनी चोरल्या 90 हजारांच्या पैठण्या, चोरीची घटना CCTVमध्ये कैद
मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हिडिओ आला समोर
कार चालकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे महामार्गावर भीषण अपघात
नागपुरची कन्या संजना जोशी राष्ट्रकुल स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्त्व, कोण आहे संजना जोशी ?
जिथे राष्ट्रवादी स्ट्राॅंग तिथे शिवसेनेवर अन्याय : खा. श्रीकांत शिंदे