प्रियकराशी बोलत असल्यामुळे रागाच्या भरात बापानेच आपल्या मुलीची केली हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकरासोबत बोलत असल्याने बापानेच आपल्या मुलीची निर्घृणपणे हत्या केली. ही 20 वर्षीय मुलगी आपल्या प्रियकराशी फोनवर बोलत होती. बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यात हि धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह नदीत फेकून देण्यात आला. यादरम्यान मुलीच्या हत्येचा ऑडिओ व्हायरल झाल्याने तिच्या बापानेच तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. यानंतर मृत मुलीची आई, बहीण आणि मामा यांनी ही ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून पोलिसांना दिली आहे. उस्मान असे आरोपी पित्याचे नाव आहे.

प्रियकराशी बोलायला केली मनाई
ही घटना बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील मोरो पोलीस ठाणे क्षेत्रातील रतनपुरा गावामध्ये घडली आहे. मृत आफरीन हिचे लग्न तिच्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या मुलासोबत निश्चित झाले होते मात्र आफरीनचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. ही गोष्ट घरातील सर्व सदस्यांना माहित होती. यावेळी तिच्या वडिलांनी आफरीनला आपल्या प्रियकरासोबत बोलण्यास मनाई केली होती. मात्र, असे असतानाही आफरीन तिच्या प्रियकराशी लपूनछपून बोलत होती.

असेच एकदा ती तिच्या प्रियकरासोबत बोलत असताना अचानक तिचे वडील घरी आले आणि ते पाहून ते संतापले. यानंतर त्याने रागाच्या भरात आफरीनला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिची हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह नदीत फेकून दिला आणि ती हरवली आहे असे गावात सांगितले. यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह पोलिसांना सापडला. यादरम्यान मुलीच्या हत्येचा ऑडिओ व्हायरल झाल्याने तिची हत्या झाल्याचे समोर आले. यानंतर मृत मुलीची आई, बहीण आणि तिच्या मामाने आरोपी वडिलांच्या विरोधात महिला हेल्पलाइनवर पोहोचून ऑडिओ क्लिप दिली आणि जीवाला धोका असल्याचे संपूर्ण कुटुंबाने सांगितले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महिला हेल्पलाइनच्या प्रकल्प व्यवस्थापक अजमनुत निशा यांनी मोरो पोलीस ठाण्याला या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची शिफारस केली. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.

हे पण वाचा :

म्हणून तरुण शेतकऱ्याने कांदा सरळ जनावरांपुढे टाकून दिला..

IND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा ! ‘या’ खेळाडूचे झाले पुनरागमन

ठाकरे सरकारकडून जनतेला दिलासा : पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशानी स्वस्त

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला थेट संभाजीराजे छत्रपतींना फोन; म्हणाले की…

राज ठाकरे…माफी नाही तर युपीही नाही, आम्ही सापळा रचला नाही; बृजभूषण सिंह यांचा हल्लाबोल

Leave a Comment