पक्षांतराबद्दल गोपीचंद पडळकर म्हणतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | मागील क्काही दिवसापासऊन गोपीचंद पडळकर हे शेतकरी कामगार पक्षात जाऊन सांगोला विधानसभेची निवडणूक लढणार अशी चर्चा सुरु होती. त्यावर त्यांनी आज भाष्य केले आहे. मी वंचितचाच आहे. वंचितमध्येच राहणार. आम्ही वंचित समाजासाठी लढा सुरु केला आहे. तो लढा असाच सुरु ठेवणार आहे. त्याच प्रमाणे प्रकाश आंबेडकरांची साथ कधीच सोडणार नाही असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे कोणत्या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढायची या बद्दल येत्या काही दिवसात आपण निर्णय घेऊन जाहीर करू असे पडळकर म्हणाले आहेत.

पडळकर यांनी सांगोला मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या होत्या. अशातच भाजपच्या वरिष्ठ केडरचे काही लोक त्यांना भेटून गेल्याने ते पुन्हा भाजपमध्ये परतणार, अशी चर्चा सुरु झाली. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी स्पष्टीकरण दिले.

याबात बोलतांना ते म्हणाले की, “माझ्यासाठी वंचितांची लढाई महत्वाची आहे. त्यासाठी मी आंबेडकरांना सोडू शकत नाही. त्यासाठी मी लढणार आहे. लोकांची इच्छा आहे, की मी जतमधून लढावे. सांगोला मतदार संघातून माझी उमेदवारी असावी. शिवाय, माझा घरचा मतदार संघ खानापूर आहेच. त्यामुळे मी कुठून लढायचे, हे ठरवावे लागेल. त्याची चाचपणी सुरु आहे. पुढील चार दिवसांत माझा मतदार संघ ठरेल.” असेही पडळकर म्हणाले.