हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Financial Changes : आता लवकरच फेब्रुवारी महिना सुरु होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेपासून आपल्या पैशांशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत. ज्याचा थेट परिणाम आपल्या बजटवर देखील होणार आहे. हे जाणून घ्या 1 फेब्रुवारी रोजी मोदी सरकार 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आपला शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. यासोबतच बँकेशी संबंधित नियमांमध्येही बदल होणार आहेत. चला तर मग या नियमांविषयीची माहिती जाणून घेउयात…
अर्थसंकल्प सादर केला जाणार
1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन या 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ज्याकडे संपूर्ण देश डोळे लावून आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय सरकार कडून घेतले जाणे अपेक्षित आहे. Financial Changes
एलपीजी किंमती वाढणार
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींचा आढावा घेतला जातो. यामध्ये दर महिन्याच्या पहिल्या तारखेला वाढ आणि घट होते. यावेळी दरात कोणताही बदल होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. Financial Changes
टाटा मोटर्सकडून प्रवासी वाहनांच्या किंमतींत वाढ
देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सकडून प्रवासी वाहनांच्या किंमतींत वाढ करण्याची घोषणा केली गेली आहे. या वाढलेल्या किंमती 1 फेब्रुवारी 2023 पासून लागू होतील. कंपनीच्या मते, सरासरी आधारावर, मॉडेल आणि व्हेरिएन्टनुसार पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या प्रवासी वाहनांच्या किंमती 1.2 टक्क्यांनी वाढतील. Financial Changes
क्रेडिट कार्डद्वारे रेंट भरण्यासाठी द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क
आता क्रेडिट कार्डद्वारे रेंट भरणे महागणार आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या क्रेडिट कार्डधारकांना मोठा धक्का दिला आहे. आता या बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे रेंट देण्यावर 1 टक्के शुल्क आकारले जाणार असल्याचे बँकेने जाहीर केले आहे. 1 फेब्रुवारी 2023 पासून हा नियम लागू होणार आहे. Financial Changes
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bobfinancial.com/fees-charges.jsp
हे पण वाचा :
PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
LIC Jeevan Azad : ‘या’ नवीन पॉलिसी अंतर्गत मिळतील अनेक फायदे, त्याविषयी जाणून घ्या
Budget 2023 : रेल्वे अर्थसंकल्प सामान्य बजटचा भाग बनण्याचा रंजक इतिहास जाणून घ्या
PIB Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप, तपासा ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्यता
Layoffs : कोरोनानंतर आता मंदीची भीती… आयटी सेक्टरमध्ये कपातीची वेळ का आली ???