लॉकडाउनच्या काळात वाढलं कॅश विड्रॉलच प्रमाण; जाणून घ्या भारतीयांच्या हातात किती रोख रक्कम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळं देशात जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत आपातकालीन परिस्थितीत अडचण येऊ नये म्हणून नागरिकांनी बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे काढले आहेत. १३ मार्च रोजी संपलेल्या पंधरवड्यात लोकांनी बँकांमधून विक्रमी ५३ हजार कोटी रुपये काढले आहेत. मागील १६ महिन्यांमधील ही विक्रमी रक्कम आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी ही माहिती दिली. साधारणत: फक्त … Read more

कोरोनाच्या आधी देशातील उपासमारच आम्हाला मारुन टाकेल; हातावरचं पोट असणाऱ्यांची घराबाहेरील व्यथा

देशातील हातावरचं पोट असणाऱ्या कामगारांची देशातील सर्वात मोठ्या राज्यात काय स्थिती आहे याचा थोडक्यात आढावा.

लॉकडाऊनमुळ दूध संघांसमोर अडचणी; लाखो लिटर दूध वितरणाविना शिल्लक

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करोनामुळे संचारबंदी लागू केल्यानंतर मुंबई पुण्यातील मोठी हॉटेल्स बंद झाल्याने पुणे विभागातून संकलित होणाऱ्या २१ लाख लिटर दुधापैकी एक लाख लिटरच्या आसपास दूध शिल्लक राहण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा अनुभव सहकारी दूधसंघांना आला असून भविष्यात खासगी संघांच्या संकलनावर ही परिणाम होण्याची शक्यता आहे. पुणे विभागातून गोकुळ, राजारामबापू सहकारी संघ, कात्रज, … Read more

कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत कपिल शर्मा-हृतिक रोशनने केली मदत,दिली लाखोंची देणगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसशी लढा देण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे आणि अत्यावश्यक सेवांशी जोडलेले लोक या संघर्षासाठी सातत्याने पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहेत. या विषाणूमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे, तर रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना दुहेरी मरणाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कॉमेडियन कपिल शर्माने देशाच्या कोरोनासाठी सुरू झालेल्या या … Read more

मोठी बातमी! गोरगरीब जनता, कामगारांसाठी सरकारची १ लाख ७० हजार कोटींची घोषणा

नवी दिल्ली | लॉकडाउनमध्ये हातावर पोट भरणाऱ्यांचे हाल होऊ नये म्हणून केंद्राने १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या नावाने विशेष पॅकेजची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. या योजेनचा लाभ देशातील ८० कोटी जनतेला मिळणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलं. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र … Read more

कोरोनाशी लढण्याचा केरळ पॅटर्न; मृत्यू कमी, सुरक्षित जीवनाची हमी

देशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला. यानंतर केरळने प्रतिबंधासाठी उचललेली पावलं अधिक सकारात्मक आणि अनुकरणीय आहेत.

दिलासादायक! कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अर्थमंत्रालयाने केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

दिल्ली | करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील महाराष्ट्रासहित ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: लॉकडाऊन आहेत. अशा परिस्थिती आयकर आणि जीएसटी संदर्भात नागरिकांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा अर्थमंत्रालयानं केल्या. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संयुक्त परिषद घेऊन या घोषणा केल्या. महत्वाच्या घोषणा – करोनाच्या पार्श्वभूमीवर आयकर भरण्याची तारीख ३० मार्च ऐवजी ३० … Read more

संचारबंदीच्या काळात काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार? घ्या जाणून

टीम, हॅलो महाराष्ट्र । कोरोना व्हायरसचे वाढते संकट ध्यानात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे आता जीवनावश्यक गोष्टी वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. त्याचसोबत जिल्ह्याच्या सीमा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. राज्यावर बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. … Read more

आठवडाभर वर्तमानपत्रांनाही सुट्टी..!! आणीबाणीनंतर पहिल्यांदाच आठवडाभर पेपर बंद राहणार

पुणे आणि मुंबईतील वृत्तपत्रविक्रेत्यांनी पेपर टाकण्यावर आठवडाभर बहिष्कार टाकल्याने २५ ते ३१ मार्च या कालावधीत वृत्तपत्रछपाई थांबवण्याचा निर्णय व्यवस्थापकांनी घेतला आहे.