माणुसकीला काळीमा! 3 हजार रुपये परत न केल्यामुळे भर बाजारात काढली धिंड; घटनाक्रम वाचून व्हाल सुन्न

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी 3 हजार रुपयांचे कर्ज परत न केल्यामुळे भाजी विक्रेत्याची नग्न धिंड काढली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींचे भाजी विक्रेत्यावर तीन हजार रुपयांचे कर्ज होते. परंतु पैशाची परतफेड करता न आल्यामुळे आरोपींनी भाजी विक्रेत्याची नग्न धिंड काढली. ज्यामुळे संपुर्ण गाव हादरून गेले.

3000 रुपयांसाठी काढली धिंड

नोएडा सेक्टर 88 मंडीमध्ये पीडित अमित रोज आपला गाडा लावतो. अमितने सुंदर नावाच्या व्यक्तीकडून पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. यातील 2000 त्याने सुंदरला देऊन टाकले होते. परंतु बाकी तीन हजार देण्यासाठी अमितने रविवार पर्यंतची वेळ मागितली होती. परंतु वेळेत पैसे न केल्यामुळे सुंदर आणि त्याच्या मित्राने अमितला मारहाण केली. एवढेच करून न थांबता त्यांनी अमितचे बाजारपेठेत नग्न धिंड काढली. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. तपासाअंती त्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एका व्यक्तीला काहीजण लाटीने मारहाण करत आहेत. त्यानंतर ते मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीला निवस्त्र करून बाजारात फिरवत आहेत. हा सर्व प्रकार सुरू असताना कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. दरम्यान, नोएडात घडलेल्या या घटनेमुळे वातावरण चांगलेच पडले आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.