हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अनेक उद्योग धंद्यावर त्याचा परिणाम झाला आहे. लॉक डाउन अनेक भारतीय लोक परदेशात अडकली आहेत तर अनेक परदेशी लोक सुद्धा भारतात आहेत. विमान सेवा बंद असल्याने कोणालाच आपल्या मायदेशी जात येत नाही. अशीच काहीशी घटना स्पेनमधील एका महिलेसोबत घडली आहे. पण लॉकडाउन तिच्यासाठी वरदान ठरला आहे.
स्पेनमधील त्रेसना सोरेनो या काही महिन्यापूर्वी भारतात आल्या होत्या मार्च मध्ये त्या कामानिमित्त भारतात आल्या होत्या. त्यानंतर त्या भारतात अडकून राहिल्या त्या इंडस्ट्रियल डिसाईनर आहे. कर्नाटकातील उडपीमध्ये मध्ये ती अडकली आहे. लॉक डाउन च्या काळात काय करायचे म्हणून तिने कन्नड भाषा शिकण्यास सुरुवात केली आता ती चांगली भाषा बोलू शकते. त्यानंतर तिने थोडीफार शेतीची पण कामे पण शिकली आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते कि , ‘माझ्यासाठी हि खास गोष्ट आहे कि, मी स्पेनमधून आल्यानंतर या लोकांच्यात सहजासहजी मिसळू शकले. मी या भागात एका ऑफिस मधल्या मित्राकडे थांबले. तो शहरात राहत नसून तो एका छोट्या खेड्यात राहतो. त्यामुळे मला त्याचा फायदा झाला. मी या तीन महिन्यात भारतीय शेतीच्या अनेक पद्धिती शिकले तसेच मी थोडीफार कन्नड हि भाषा बोलू शकते. या भागातील लोकांनी तिला फार मदत केली . तसेच या भागातील लोक हि मला आवडले’ असे ती म्हणाली.
मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात ती भारतात आली होती. त्रेसना सोरेनो हिने भारतात येण्याचाच निर्णय तिच्या भावाच्या आणि मित्राच्या सल्ल्यानुसार घेतला होता. ती ऑफिस मित्राच्या घरी राहिली आहे. ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत भारतात आली. अगोदर भारत आणि नंतर श्रीलंका फिरण्याचा प्लॅन केला त्यांनी केला होता. परंतु तिचा बॉयफ्रेंड हा अचानक आलेल्या परिस्थितीमुळे मुंबई विमानतळावरून स्पेनला गेला आणि ती मात्र इथेच अडकून राहिली. परंतु ज्या देशात आपण अडकलो आहोत त्याचे टेन्शन न घेता तिने त्या संस्कृतीची एकरूप होण्याचा प्रयत्न केला. तिने शेतात रोपे लावणे , कापणी करणे , अशी अनेक कामे केली आहेत. रांगोळी काढणे , झाडू तयार करणे अशी अनेक कामे ती आनंदाने करत आहे. वेगवेगळी कामे शिकण्यात तिला रस आहे. स्पेनला जाण्यापूर्वी तिला श्रीलंका आणि गोवा फिरायचं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.