अमरावती प्रतिनिधी | माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत वंचित बहुजन आघाडीत जाणार असल्याची चर्चा आता चांगलीच रंगात आली आहे. रावसाहेब शेखावत यांनी वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली असल्याचे देखील बोलले जाते आहे. त्याच प्रमाणे त्यांनी देखील प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याचे कबूल केले आहे.
काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसमधील लोकांच्या राजकारणाला सुरुंग लावण्यासाठी रावसाहेब शेखावत कुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या अशा वागण्यामुळे पक्ष नेतृत्व त्यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही अशी भीती आहे. त्यामुळे त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचितमध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला असावा असे बोलले जाऊ लागले आहे.
अमरावती विधानसभा मतदारसंघातून ते या वेळी देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत असे सूत्रांकडून समजले आहे. तर त्याच ठिकाणी भाजपचे डॉ. सुनील देशमुख हे आमदार आहेत.त्यांच्या विरोधात रावसाहेब शेखावत हे वंचित आघाडी कडून दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत.
इत्तर महत्वाच्या बातम्या –
मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांचा भाजप प्रवेश
आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार राजीनामे देऊन भाजपमध्ये येणार : चंद्रकांत पाटील
आपसातले मतभेद विसरा संकट मोठं आहे एक होऊन लढा : बाळासाहेब थोरात
राष्ट्रवादीची मान्यता जाणार ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पार्थ पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया
युतीने तिकीट नाकारल्यास शिवसेनेचा हा जिल्हाध्यक्ष लढवणार अपक्ष निवडणूक