कोरोनाचा धोका वाढला; परदेशातून आलेल्या चौघांना Corona च्या नव्या व्हेरियंटची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या प्रादूर्भावाचा चांगलाच धुमाकूळ माजलेला आहे. चीनमध्ये आढळलेल्या नव्या व्हेरियंटमुळे केंद्र सरकारकडूनही विशेष दक्षता घेतली जात आहे. भारतातही कबीरदारी घेण्याच्या सूचना केंद्रातून देण्यात आल्या असताना आता परदेशातून बिहारमध्ये आलेल्या चार प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे. यापैकी तीन जण हे म्यानमारचे रहिवासी तर एकजण बँकाँक येथे राहणारा आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या आढळलेल्या रुग्णांमुळे भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. वेण्या व्हेरियंटच्या चार रुग्णांना सध्या बिहार प्रशासनाकडून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेले आहे. यापूर्वी एक प्रवाशी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिकार झाला आहे. उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे चीनमधून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली असून संबंधित रुग्णावर सध्या उपचार सुरु आहे.

बिहारच्या गया जिल्ह्यात दोन दिवसांचा बौद्ध सेमिनार होणार आहे. या सेमिनारच्या कार्यक्रमात दलाई लामा हे देखील सहभागी होणार आहेत. या सेमिनारला जगाच्या वेगवेगळ्या भागातून अनेक बौद्ध भिक्षु येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता बिहारमध्ये आलेल्या चार प्रवाशांना नव्या व्हेरियंटची लागण झाली असल्यामुळे प्रशासनाकडून विशेष काळजी घेतळी जात आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोविड टेस्ट केली जात आहे.