धक्कादायक ! स्वयंपाकाच्या बहाण्याने घरी बोलवून तरुणीवर सामूहिक बलात्कार

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे जिल्ह्यातील लामकानी याठिकाणी दोन मित्रांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. या आरोपींनी या पीडित तरुणीला घरी स्वयंपाक करण्यासाठी बोलवले आणि आपल्या मित्राच्या मदतीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे आरोपी नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अत्याचाराचा व्हिडीओदेखील शूट केला. हि घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल पुढील तपास सुरु केला आहे.

अनिल भिल आणि काळू भिल अशी आरोपींची नावे आहे. घटनेच्या दिवशी आरोपी अनिल भिल याची पत्नी गावाला गेली होती. यादरम्यान अनिलने आपला मित्र काळू भिल याला आपल्या घरी बोलवले होते. यावेळी आरोपीने स्वयंपाक करण्याचा बहाणा करत शेजारी राहणाऱ्या एका 28 वर्षीय युवतीला आपल्या घरी बोलावले. यावेळी मदत करण्याच्या भावनेतून पीडित तरुणीही स्वयंपाक करण्यासाठी आरोपीच्या घरी आली.

यानंतर पीडितेने घरात येऊन दरवाजा बंद केला. यानंतर आरोपी अनिलने पीडितेला धमकावून तिच्यासोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली. यावेळी आरोपी अनिल भिलचा मित्र काळू भिल देखील घरामध्येच लपून बसला होता. आरोपी अनिल भिल याने पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यानी या घटनेचा व्हिडिओदेखील बनवला. यानंतर आरोपीचा मित्र काळू यानंही पीडितेवर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर दोन्ही आरोपींनी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत या तरुणीला सोडून दिले. यानंतर पीडितेने थेट पोलीस स्टेशन गाठत दोघांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपी विरोधात बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील घटनेचा तपास सुरु केला आहे.