हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले Gautam Adani हे महिलांच्या क्रिकेट लीग (WIPL) मधील टीम खरेदी करणार असल्याची चर्चा सध्या चांगलीच जोर धरू लागली आहे. वास्तविक, अदानी ग्रुपने महिलांच्या क्रिकेट लीगमधील टीम खरेदी करण्यास रस दाखविला आहे. अदानी यांच्या ग्रुपशिवाय, हल्दीराम प्रभुजी, कॅप्री ग्लोबल, कोटक, आदित्य बिर्ला आणि टोरंटो ग्रुप देखील या लीगमधील टीम खरेदी करण्यास पुढे आले आहेत.
एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, 30 पेक्षा जास्त कंपन्यांनी 5 कोटी रुपयांमध्ये या लीगमधील टीमच्या बोलीसाठीचे डॉक्युमेंट्स खरेदी केले आहेत. ज्यामध्ये पुरुषांच्या IPL मधील टीम्समध्ये मालकी असलेल्या 10 कंपन्यांचा देखील समावेश आहे. तसेच यामध्ये 2021 मधील पुरुषांच्या IPL मधील टीम खरेदी अपयशी ठरलेल्या कंपन्या देखील सामील आहेत. Gautam Adani
त्याचप्रमाणे मुकेश अंबानी यांची मालकी असलेले मुंबई इंडियन्स देखील WIPL मधील टीमच्या लिलावाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सने देखील या लीगमधील टीम खरेदी करण्यास रस दाखविला आहे. Gautam Adani
WIPL मधील प्रत्येक टीम 500-600 कोटींमध्ये विकली जाण्याची शक्यता आहे. 25 जानेवारी रोजी WIPL च्या टीम साथीचा लिलाव होणार आहे. 5 टीम असलेल्या या महिलांच्या IPL चा पहिला सामना मार्च मध्ये मुंबई येथे खेळवला जाईल. Gautam Adani
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.iplt20.com/teams/women
हे पण वाचा :
PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
LIC Jeevan Azad : ‘या’ नवीन पॉलिसी अंतर्गत मिळतील अनेक फायदे, त्याविषयी जाणून घ्या
Budget 2023 : रेल्वे अर्थसंकल्प सामान्य बजटचा भाग बनण्याचा रंजक इतिहास जाणून घ्या
PIB Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप, तपासा ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्यता
Layoffs : कोरोनानंतर आता मंदीची भीती… आयटी सेक्टरमध्ये कपातीची वेळ का आली ???