व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

दादा मला माफ करा, गौतमीने हात जोडत मागितली अजितदादांची माफी; नेमकं प्रकरण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून लावणी म्हंटल कि एकच नाव लोकांच्या तोंडी निघत आहे ते म्हणजे गौतमी पाटील होय. महाराष्ट्रात गौतमी पाटील या नावाची चांगलीच चर्चा आहे. गौतमीच्या डान्सने तरुणांना अक्षरश: वेड लावले आहे. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमांना विरोध होत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गौतमी पाटील हिला राष्ट्रवादीच्या मंचावर बोलावू नका, असे कार्यकर्त्यांना ताकीद दिल्यानंतर गौतमी पाटीलने यावर प्रतिक्रिया दिली आहे. गौतमीने दादांची हात जोडून माफी मागितली असून “दादा माझ्याकडून काही चुकलं असेल तर दादा मला माफ करा,” असे गौतमीने म्हटले आहे.

नुकतीच अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. पदाधिकाऱ्यांसह झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे यांनी बैठकीत अश्लील कार्यक्रमांचा मुद्दा उपस्थित केला होता. मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार मेघा घाडगे यांनी अजित पवारांकडे केली होती. यानंतर अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.

दरम्यान, अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर गौतमी पाटीलने प्रतिक्रिया देत दादांची हात जोडून माफी मागितली. ‘याआधी माझ्याकडून काही चुका झाल्या. मात्र, लोकांनी माझ्या चुका लक्षात आणून दिल्यानंतर मी त्या सुधारल्या. तेव्हापासून माझ्या नृत्यावर आक्षेप घेतले जात नाहीत. तेव्हापासून मी अश्चील नृत्य तसेच वादग्रस्त हावभाव करत नाही. पण तरीही माझ्याकडून काही चुकलं असेल तर दादा मला माफ करा’, असे गौतमीने म्हटले आहे.

अजितदादा खूप मोठे आहेत. त्यांना मी काहीही बोलू शकत नाही. पण जेव्हा जेव्हा मी चुकले तेव्हा माफी मागितली. माझ्यात सुधारणा होऊनही माझ्या वागण्याची कुणीच दखल का घेत नाही? माझ्या सुधारणावादी वागण्यावर कुणीच का बोलत नाही? असे गौतमी हिने म्हंटले आहे.