हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत सरकार हे देशभरातील विज्ञानसंदर्भात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना’ चालवत असते. या योजनेमधून विज्ञान क्षेत्रामध्ये करिअर बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये ते सात हजार रुपये प्रति महिन्यासाठी वेगवेगळी शिष्यवृत्ती दिली जाते.
शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठस्तरीय विज्ञान संबंधित विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी भारत सरकारच्या वतीने ही शिष्यवृत्ती सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत अकरावी, बारावी आणि पदवी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. ‘भारतीय विज्ञान संस्था’, बेंगलोर या योजनेचे संचालन करते. या योजनेला ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना’ असे नाव दिले आहे. या अंतर्गत विज्ञान, तंत्रज्ञान आणि औषधक्षेत्र यामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिले जाते. या योजनेची सुरुवात 1999 मध्ये करण्यात आली. देशभरातील विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांची दडलेली प्रतिभेला चालना देण्याचे मूळ उद्देश या योजनेचे आहे.
दोन पातळीमध्ये ही परीक्षा आयोजित केले जाते. पहिल्या पातळीमध्ये ऑनलाइन एप्टीट्यूड टेस्ट आणि दुसऱ्या पातळीत मुलाखत घेतली जाते. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन शिष्यवृत्तीमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये गणित आणि विज्ञान या विषयामध्ये 75 टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे. यासोबत अनुसूचित जाती आणि जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दहा टक्क्यांची सूट दिली जाते. तसेच पदवीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये 60 टक्के गुण घेणे आवश्यक आहे. यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दहा टक्क्यांची सूटेसह त्यांना 50 टक्के गुण आणणे बंधनकारक आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.