हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणासुदीच्या काळात नागरिकांकडून भरपूर खरेदी देखील केली जाते. ज्यामुळे या काळात पैशांची कमतरता भासू शकते. अशा वेळी ही कमतरता दूर करण्यासाठी लोकांकडून कर्ज घेतले जाते. यासाठी अनेकदा पर्सनल लोन घेण्याकडे लोकांचा ओढा जास्त असतो. मात्र यासाठी गोल्ड लोन देखील एक चांगला पर्याय ठरू शकेल. जर आपल्याकडे Sovereign Gold Bond असतील तर याद्वारे कर्ज मिळवणे सोपे होते. हे लक्षात घ्या कि, बँका आणि वित्तीय संस्थांकडून सॉव्हरेन गोल्ड बाँड (SBG) वर देखील कर्ज दिले जाते जे पर्सनल लोनपेक्षा स्वस्तही असते.
अशा प्रकारे SBG वर मिळवा लोन
सरकारकडून जारी करण्यात येणाऱ्या Sovereign Gold Bond द्वारे गुंतवणूकदारांना संबंधित बँक किंवा NBFC मध्ये कर्जासाठी अर्ज करता येईल. मात्र हे लक्षात घ्या कि, SBG वर कर्ज मिळविण्यासाठी गुंतवणूकदाराकडे डीमॅट खाते असणे जरुरीचे आहे. तसेच 21 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही नागरिकाला त्याद्वारे कर्ज मिळू शकेल. वास्तविक, सॉव्हरेन गोल्ड बाँड हे एक प्रकारचे फिजिकल गोल्डचआहे, ज्याची किंमत सरकारकडून आधीच निश्चित केली जाते.
किती कर्ज मिळू शकेल
हे लक्षात घ्या कि, Sovereign Gold Bond वर वेगवेगळ्या बँकाकडून वेगवेगळी कर्जाची रक्कम दिली जाईल. SBI कडून SBG वर कमीत कमी 20 हजार रुपये तर जास्तीत जास्त 20 लाख रुपये कर्ज दिले जाईल. तसेच युनियन बँक ऑफ इंडिया कमीत कमी 50 हजार आणि जास्तीत जास्त 25 लाख रुपये कर्ज दिले जाईल. एक्सिस बँक 25 हजार ते 25 लाखांपर्यंत कर्ज देते तर HDFC बँक SBG वर 10 हजारांपर्यंत कर्ज देईल.
व्याज दर किती असेल ???
Sovereign Gold Bond वर वेगवेगळ्या बँकाकडून वेगवेगळे व्याजदर आकारले जातील. तसे, हे एक प्रकारचे कोलॅटरल लोन आहे, ज्यावर बँकांचा धोका खूप कमी आहे. यामुळेच या प्रकारच्या कर्जावरील व्याजदर हा पर्सनल लोन पेक्षा कमी असतो. SBI कडून SBG वर 9.70 टक्के तर युनियन बँकेकडून 10 टक्के व्याज दर आकारले जाते. यासाठी बँकाकडून प्रोसेसिंग फीस देखील आकारली जाईल. तसेच या कर्जाचा कालावधी दोन किंवा तीन वर्षांचा असतो.
कर्ज घेण्याआधी मार्जिनचे गणित समजून घ्या
बँकाकडून SBG वर सहजपणे कर्ज दिले जाते, मात्र बाँडच्या किंमतीवर मजबूत मार्जिन घेतले जाते. उदाहरणार्थ, SBI सॉव्हरेन गोल्ड बाँड्सच्या मार्केट व्हॅल्यूच्या 40 टक्क्यांपर्यंत मार्जिन राखते. याचा अर्थ असा की, जर आपला बाँड 1 लाख रुपयांचा असेल तर बँक 40 टक्के मार्जिन ठेवेल आणि आपल्याला फक्त 60 हजार रुपयांचे कर्ज देईल. त्याचप्रमाणे युनियन बँकेचे मार्जिन 30 ते 40 टक्के आहे. म्हणजेच येथे 1 लाखाच्या SBG वर 60 ते 70 हजार रुपयांचे कर्ज मिळेल. वेगवेगळ्या बँकांचे मार्जिन दरही वेगवेगळे राहतील.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :https://sbi.co.in/web/personal-banking/loans/loans-against-securities/loan-against-sovereign-gold-bond
हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून 184 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीच्या दरात वाढ
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा फ्री कॉलिंग अन् डेटा !!!
WhatsApp वर लवकरच मिळणार ‘हे’ 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने खरेदी करताय? पहा काय आहे यासाठीचा शुभ मुहूर्त