घरातले सोने आपल्या अडचणीच्या काळात ‘या’ योजनेत गुंतवून मिळवा मोठे फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | सोन्याच्या किमती करोणाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सोन्याच्या भावामध्ये पाहायला मिळतो. सध्या सोन्याचे भाव जास्त असल्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल कमी असल्याचे दिसून येत आहे. जर तुमच्या घरामध्ये सोने पडून असेल तर तुम्ही या तेजीच्या काळामध्ये तुमचे सोने या योजनेमध्ये गुंतवून पैसे मिळवू शकता. या काळामध्ये, कशा प्रकारे सोन्याच्या वाढत्या किमतीपासून पैसे आपण मिळवू शकाल याबाबत जास्त माहिती घेऊ.

केंद्र सरकारने ‘गोल्ड मोनेटायझेशन स्कीम’ काही दिवसापासून सुरू केली आहे. या योजनेमार्फत तुम्हाला सोन्याच्या वाढत्या दरापासून नफा होणार आहे. आणि अतिरिक्त कमाई सुद्धा होऊ शकणार आहे. या योजनेमध्ये तुम्हाला तुमचे सोने जमा करावे लागेल. आणि या बदल्यात बँकेकडून त्यावर व्याज मिळेल. जर तुम्हाला काही दिवसानंतर सोने काढून घ्यायचे असेल तर, जमा केलेले सोने परत तुम्ही काढून घेऊ शकता. अडी-अडचणीच्या काळात सोने हे तात्काळ पैसे मिळवून देण्यासाठी फार उपयोगी मानले जाते.

या योजनेअंतर्गत मध्यम मूदतीसाठी पाच ते सात वर्ष आणि दीर्घ मुदतीसाठी बारा वर्ष सोने बँकेमध्ये ठेवता येऊ शकते. म्हणजेच या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही पाच वर्षानंतर तुमचे सोने परत घेऊ शकता. पण जेव्हा तुम्ही सोने परत घ्यायला जाता तेव्हा ते तुम्ही दिलेल्या स्वरूपात नसून ते वितळून त्याची बिस्किट किंवा नाने बनवलेले असते. त्या स्वरूपात ते तुम्हाला दिले जाते सरकार या योजनेमधून मिळालेले दागिने वितळून त्या सोन्याचा वापर अर्थव्यवस्थेत करते आणि याच्या बदल्यात तुम्हाला व्याज मिळत असते.