जळगाव प्रतिनिधी | भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत देखील नाही. त्यामुळे खडसेंपुढे अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ते अपक्ष उमेदवारी करण्याच्या पवित्र्यात आहेत. अशा सर्व पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी या बद्दल सूचक वक्तव्य केले आहे. गिरीश महाजन यांनी आपल्या पारंपरिक जामनेर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
एकनाथ खडसे हे आमचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी पक्ष मोठा होण्यासाठी मोठे कष्ट घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारी बद्दल पक्ष निश्चितच सकारात्मक विचार करत आहे. उद्या ४ तारखेला सकाळी भाजपची तिसरी आणि शेवटची यादी जाहीर होणार आहे. यादीत खडसेंचे नाव असण्याची शक्यता आहे असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. अजित पवार एकनाथ खडसे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी आले होते असा प्रश्न महाजन यांना विचारला असता त्यांनी राष्ट्रवादीच्या वाताहतीवर बोट ठेवले आहे. जळगाव जिल्ह्यात खात उघडणं राष्ट्रवादीसाठी अवघड होऊन बसल्याने राष्ट्रवादी नेत्यांच्या शोधात आहे. मात्र खडसे भाजपला सोडणार नाहीत ते भाजप सोबतच राहतील असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.
दरम्यान मागील दोन दिवसापासून एकनाथ खडसे यांच्या निवास स्थाना बाहेर त्यांच्या समर्थकांनी भाजप उमेदवारीसाठी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. त्यांची समजूत काढण्याचे काम खडसे स्वतः करत असून त्यांनी तिकीट दिल्यास अपक्ष उभा राहण्याचा निर्धार केला आहे.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाच्या बातम्या –
खडसेंना राष्ट्रवादीत घेण्याच्या हालचाली वाढल्या; अजित पवारांचा बीड दौरा अचानक रद्द
तुझ माझ जमेना तुझ्या वाचून करमेना असं म्हणत शरद पवारांनी दिली माढ्यात बबन शिंदेंना उमेदवारी
मनसेच्या नितिन नांदगावकरांचा शिवसेनेत प्रवेश