सिडनी : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवबाबत (Suryakumar Yadav) ऑस्ट्रेलियाचा स्फोटक ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलने मोठे विधान केले आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सारख्या फलंदाजाला बिग बॅश लीगमध्ये विकत घेणे शक्य नाही आहे. त्याला खरेदी करण्याइतके पैसे नसल्याचे ग्लेन मॅक्सवेलने म्हंटले आहे.
नेमके काय म्हणाला मॅक्सवेल?
ग्लेन मॅक्सवेलला एका मुलाखतीत भविष्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसेल का? असा प्रश्न विचारला असता “आमच्याकडचे पैसे कमी पडतील. सूर्यकुमार यादवला विकत घेणं शक्य नाही आहे.
त्याला बॉलिंग करणं गोलंदाजासाठी चॅलेंज
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो नवनवीन विक्रम रचत आहे. चालू वर्षात सूर्यकुमारने 31 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1164 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतक आणि नऊ अर्धशतक यांचा समावेश आहे. सध्या सूर्यकुमार यादव आयसीसीच्या टी 20 रँकिंगमध्ये क्रिकेट विश्वातील नंबर 1 फलंदाज आहे. त्याची खेळण्याची शैली पाहून सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) गोलंदाजी करणं कुठल्याही गोलंदाजासाठी आव्हानात्मक आहे.
हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..