व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक! दोन जिवलग मित्रांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

पनवेल : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. यामध्ये आज पहाटे दोन जिवलग मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू (accident) झाला आहे. या घटनेमुळे दोन्ही मित्रांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. हे दोघेजण अर्टिंगा कारने घरी परतत होते. त्यावेळी काळाने त्यांच्याव झडप घातली (accident) आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मोहिंदर गावंड आणि अलंकार पाटील अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोन जिवलग मित्रांची नावे आहेत. घटनेच्या वेळी मोहिंदर आणि अलंकार हे दोघे पनवेल परिसरात मित्रांकडे आणि नातेवाईकांकडे गेले होते. त्या ठिकाणाहून माघारी परतत असताना हा भीषण अपघात (accident) झाला. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.

या अपघातात त्यांच्या कारच्या समोरच्या बाजूची काच, दर्शनी भाग, याचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. कारची झालेली अवस्था पाहून हा अपघात भयंकर होता याचा तुम्ही अंदाज लावू शकता. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे (accident) आवरे गावात शोककळा पसरली असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीदेखील पुण्यातील नवले ब्रिजवर असाच भीषण अपघात झाला होता.

हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..