हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी झालेल्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी २४ कॅरेट सोने हे पुन्हा महाग झाले. आता, १० ग्रॅम सोन्याच्या ९९९ साठी आपल्याला ४७३५६ रुपये मोजावे लागतील. यापूर्वी मंगळवारी सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण झाली होती. सोन्याचा भाव सुमारे ४८,००० रुपयांवरून ४६९६६ रुपयांवर आला होता. त्याच वेळी, चांदीही पुन्हा एकदा तेजीचे आली आहे. सकाळच्या व्यापारात चांदीचा दर प्रति किलो १५१५ रुपयांनी वाढला आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाइट (ibjarates.com) त्यांची सरासरी किंमत अपडेट करत असते. ibjarates च्या मते, 20 मे 2020 रोजी सोने आणि चांदीचे दर खालीलप्रमाणे आहेत.
धातू मे 20 सकाळ दर (रुपये / 10 ग्रॅम) दर मे 19 दर (रुपये / 10 ग्राम) दर बदल (रुपये / 10 ग्रॅम)
सोने 999 47356 46829 527
सोने 995 47166 46641 525
सोने 916 43378 42895 483
सोने 750 35517 35122 395
सोने 585 27703 27395 308
चांदी 999 48315 रुपये / किलो 46800 रुपये / किलो 1515 रुपये / किलो
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन, दिल्लीचे मीडिया प्रभारी राजेश खोसला यांनी दिलेल्या माहितीनुसार, इब्जा देशभरातील १४ केंद्रांकडून सोन्या-चांदीची सरासरी किंमत दर्शविते. खोसला म्हणतात की सध्याचा सोने-चांदीचा करेंट रेट किंवा स्पॉट किंमत ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी असू शकते, परंतु त्यांच्या किंमतींमध्ये अगदी थोडाच फरक असतो.
गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या दराने प्रति १० ग्रॅम ४५७४३ रुपयांवरून उडी घेऊन ४८,००० रुपये झाला आणि त्यायानंतर एकाच दिवसाने एक हजाराहून अधिकचा तोटा होऊन ते ४६,९६६ पर्यंत पोहोचले. ५ मे २०२० रोजी २४ कॅरेट सोन्याचे मूल्य हे प्रति १० ग्रॅम ४५७४३ रुपये होते. त्यानंतर ते ८ मे रोजी ४६२२१ वर पोचले, परंतु १४ मेपासून यास गती मिळाली.
या दिवशी तो ४६२४६ वर पोहोचला, दुसर्या दिवशी त्याने ४६,७९१ रुपयांपर्यंत वाढून एक नवीन विक्रम रचला आणि १८ मे रोजीचा दर प्रति १० ग्रॅम ४७९४८ रुपयांच्या उंचीवर पोहोचला, परंतु दुसर्याच दिवशी सोने ४६,९६६ रुपयांवर घसरले आणि आज म्हणजेच २० मे रोजी सोने पुन्हा एकदा ५२७ रुपयांनी वाढून ४७३६५ रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे.
स्पॉट डिमांडमुळे सोन्याचे वायदा वाढले
बुधवारी जोरदार मागणीमुळे सोन्याचे भाव वायद्याच्या व्यापारात २२० रुपयांनी वाढून ४७,२७० रुपयांवर गेले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) मध्ये जूनसाठी सोन्याचा करार २२० रुपये किंवा ०.४७ टक्क्यांनी वाढून ४७,४७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. या दराने, आज ११,४२० लॉटमध्ये व्यापार झाला . ऑगस्टच्या सुवर्ण दरात १९७ रुपये किंवा ०.४२ टक्क्यांनी वाढ होऊन १००७१लॉटमध्ये व्यापार झाला. जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव ०.४२ टक्क्यांनी वधारून ते १,७५३ डॉलर प्रति औंस झाले.
लॉकडाउनमध्ये अनेक रेकॉर्ड बनले आणि मोडले
९ एप्रिल रोजी पहिल्यांदाच सोन्याचा भाव ४५,२०१ रुपयांच्या नवीन उंचीवर पोहोचला. याच्या चारच दिवसांनंतर हा विक्रम मोडला गेला आणि १३ एप्रिल रोजी सोन्याचे दर दहा ग्रॅम ४६,०३४ रुपयांवर पोहोचले. सोन्याने या दिवशी नवीन विक्रम स्थापित केला, मात्र १५ एप्रिल रोजी तो कोसळला. सोन्याने प्रति १० ग्रॅम ४६,५३४ रुपयांची नवीन शिखरे गाठली. या विक्रमांना याच्या दुसर्याच दिवशी १६ एप्रिलला ब्रेक लागला आणि १० ग्रॅम सोन्याची किंमत ४६,९२८ रुपये झाली होती. यानंतर १५ मे रोजी सोन्याने ४७०६७ रुपयांवर पोहोचून आणखी एक नवा विक्रम केला. १८ मे रोजीही हा विक्रम मोडला गेला ज्यावेळी सोने ४७,८६१ रुपयांवर पोहोचले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.