सोन्या-चांदीच्या किंमती आज पुन्हा वाढल्या, नवीन किंमत काय आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे भारतीय रुपया कमकुवत झाला आहे. याचा परिणाम आज देशांतर्गत सराफा बाजारात दिसून आला. दिल्ली सराफा बाजारात प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 122 रुपयांची वाढ झाली. त्याचबरोबर, एक किलो चांदीची किंमत 340 रुपयांनी वाढली आहे. तथापि, तज्ञांचे मत आहे की, देशात आणि जगात कोरोना विषाणूची प्रकरणे वाढतच आहेत. अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढत आहे. तसेच भारत आणि चीनसारख्या मोठ्या बाजारात ग्राहकांची मागणी देखील खूपच कमी झालेली आहे. म्हणूनच सोन्याच्या किंमती खालच्या श्रेणीत राहू शकतात.

सोन्याचे आजचे नवीन दर
सोमवारप्रमाणे मंगळवारीही दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 51,867 रुपयांवरून वाढून 51,989 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे. या काळात प्रति दहा ग्रॅमच्या किंमती 122 रुपयांनी वाढल्या आहेत.

चांदीचे आजचे नवीन दर
सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीही वाढीस लागल्या आहेत. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये एक किलोग्रॅम चांदीचा भाव प्रति दहा ग्रॅम 69,325 रुपयांवरून वाढून 69,665 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

सोन्यावर मिळते आहे भारी सूट
गेल्या महिन्यात 7 ऑगस्ट रोजी सोन्याने सर्वाधिक पातळी गाठली आणि प्रति दहा ग्रॅमची किंमत 56,200 रुपये झाली. त्यानंतर महिन्याभरात सोन्याच्या किंमती सुमारे 5500 रुपयांनी खाली आल्या आहेत. म्हणजेच एका महिन्यात सोन्याच्या किंमतीत 10 टक्क्यांनी घट झाली. म्हणजेच सोन्याच्या किंमतींमध्ये इतकी घसरण झाली आहे की, ही सोन्याची खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

एवढी मोठी घसरण झाली तरी, व्यापाऱ्यांनी सूट देणे बंद केले नाही. ऑगस्ट महिन्यात डीलर्सनी ग्राहकांना मोठी सूट दिली आहे. गेल्या व्यावसायिक आठवड्यातही ग्राहकांना प्रति औंस सुमारे 40 डॉलर पर्यंतची सूट मिळाली आहे. सोन्याच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार देखील हे एक कारण असू शकतात. भारतात 12.5 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के जीएसटी सोन्याच्या किंमतींशी जोडलेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”