इचलकरंजीत तब्बल पावणे दोन कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबनूर येथे सुरू असलेल्या स्थिर पोलीस पथकाकडून तपासणी मध्ये एका कारमधून तब्बल पावणे दोन कोटीचे सोन्या – चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागाकडून याबाबत अधिक चौकशी सुरू असून यामुळे शहर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. यामध्ये कोल्हापूर रोड, स्टेशन रोड, नदीवेस नाका आणि यड्राव फाटा येथे स्थिर पोलीस पथके तैनात आहेत. यावेळी शुक्रवारी रात्री उशिरा इचलकरंजीहून कोल्हापूरकडे जाणारी कार संशयावरून थांबवण्यात आली. तपासणी केली असता यातमध्ये साडे चार किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याबाबत आयकर विभागातील अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.

शिवाजी नगर पोलिसात याप्रकरणाची नोंद घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली असून प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. तसेच ह्यामधून अजून कोण सामील आहे ह्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, शिवाजी नगर पोलिसांकडून रात्रीच्या गस्तीवेळी येथील पंचगंगा नदीवरील जुना पुलावर ३ किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. याबाबत पोलिसात खातरजमा करण्याचे काम सुरू असून नोंद घेण्याचे काम सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मोठ्या कारवाईची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment