हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली. त्याचबरोबर चांदीही महागली. यावेळी सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 107 रुपयांची वाढ झाली तर चांदीच्या दरात 1,337 रुपयांची वाढ झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटवरील माहिती नुसार, गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला (22 ते 26 ऑगस्ट) 24 कॅरेट सोन्याचा दर 50,770 होता, जो शुक्रवारपर्यंत वाढून 50,877 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 53,363 रुपयांवरून 54,700 रुपये प्रति किलो झाली.
इथे हे लक्षात घ्या की, IBGA कडून जाहीर करण्यात किंमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टँडर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. Iतसेच या किंमती देशभरात सार्वत्रिक आहेत मात्र त्यामध्ये GST चा समावेश नाही. Gold Price
गेल्या आठवड्यातील सोन्याच्या किंमती
5 सप्टेंबर 2022 – 50,770 रुपये प्रति 10 ग्रॅम
6 सप्टेंबर 2022- 50,761 रुपये प्रति 10 ग्रॅम
7 सप्टेंबर 2022- 50,553 रुपये प्रति 10 ग्रॅम
8 सप्टेंबर 2022- 50,902 रुपये प्रति 10 ग्रॅम
9 सप्टेंबर 2022- 50,877 रुपये प्रति 10 ग्रॅम
गेल्या आठवड्यातील चांदीच्या किंमती
5 सप्टेंबर 2022- रुपये 53,363 प्रति किलो
6 सप्टेंबर 2022- रुपये 53,696 प्रति किलो
7 सप्टेंबर 2022- रुपये 53,396 प्रति किलो
8 सप्टेंबर 2022- रुपये 54,320 प्रति किलो
8 सप्टेंबर 2022- रुपये 54,700 प्रति किलो
MCX वरील सोन्या-चांदीचा भाव
गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीमध्ये खालच्या पातळीवरून सुधारणा झाली. MCX वर सोन्याचा भाव 0.32 टक्क्यांनी वाढून 50529 वर बंद झाला. सोन्याची स्पॉट प्राईस 0.28 टक्क्यांनी वाढून $1716.20 वर बंद झाली. त्याच प्रमाणे MCX वर चांदीचा भाव 3.82 टक्क्यांनी वाढून 55050 च्या पातळीवर बंद झाला. चांदीची स्पॉट प्राईस देखील खालच्या पातळीवरून 4.35 टक्क्यांनी वाढून $18.81 वर बंद झाली. Gold Price
IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष असलेले अनुज गुप्ता यांनी सांगितले कि, “येत्या आठवड्यात सोन्या-चांदीमध्ये आणखी सकारात्मक वाढ होण्याची अपेक्षा आहे. यावेळी सोन्याला 50100 ($1700) वर सपोर्ट आणि 50900 ($1735) वर रेझिस्टन्स मिळू शकतो. चांदी 54500 ($18) वर सपोर्ट आणि 56500 ($19.50) वर रेझिस्टन्स मिळवू शकते.” Gold Price
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.ibja.co/
हे पण वाचा :
Google Pay वर अशा प्रकारे तयार करा एकापेक्षा जास्त UPI आयडी !!!
Investment : ELSS की PPF यापैकी कोणती योजना जास्त फायदेशीर आहे ??? तज्ञांकडून जाणून घ्या
ICICI Bank ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!! 23 वर्षात दिला 220 पट रिटर्न
फक्त 50 हजार रुपयांत परदेश प्रवासाची संधी !!! IRCTC कडून स्वस्त हवाई टूर पॅकेज लाँच