हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या भाववाढीचा कल सलग 16 दिवस कायम राहिला. शुक्रवारी प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत पहिल्यांदाच 57 हजार रुपयांच्या पलीकडे गेली. त्याचवेळी, एक किलो चांदीची किंमत 77 हजार रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली. कमोडिटी अॅनालिस्ट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अमेरिकेच्या कमकुवत डॉलरमुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. जगातील प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरचा निर्देशांक हा गेल्या दोन वर्षांतील सर्वात कमी पातळीवर पोहोचला. या व्यतिरिक्त, मध्यवर्ती बँकांकडून आणखी प्रोत्साहनांची अपेक्षा तसेच चीन आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाची पार्शवभूमी यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली.
सोन्याचे नवीन दर
शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 57,008 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. यापूर्वी गुरुवारी ते प्रति दहा ग्रॅम 57,002 रुपयांवर बंद झाले होते. यावेळी सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममध्ये 6 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचवेळी मुंबईतील सोन्याचा भाव दहा ग्रॅम 56645 रुपयांवर गेला.
चांदीचे नवीन दर
शुक्रवारी दिल्लीत एक किलो चांदीची किंमत 77,264 रुपयांवरून 77,840 रुपयांवर गेली आहे. यावेळी, चांदीच्या किंमतींमध्ये 576.रुपयांनी जोरदार वाढ झाली आहे मुंबईत चांदीचे दर प्रति किलो 76008 रुपयांवर पोहोचले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने नवीन उच्चांकास स्पर्श केला
जागतिक बाजारात आज स्पॉट गोल्ड 0.3% वाढीसह 2,068.32 डॉलर प्रति औंस पातळीवर होता. यापूर्वी, सोन्याने पहिल्यांदाच प्रति औंस 2072 च्या पातळीला स्पर्श केला. चांदी सुमारे 30 डॉलर पर्यंत पोहोचली. त्याच वेळी, सोन्याच्या किंमतींवर परिणाम करणारे 10 वर्षाचे अमेरिकन बाँडचे यील्ड गेल्या पाच महिन्यांच्या नीचांकावर घसरले. आज जाहीर झालेल्या अमेरिकेच्या मासिक रोजगाराच्या आकडेवारीवर व्यावसायिकांचे लक्ष लागून आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.