हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासुन (Gold Price Today) सोने चांदीच्या किमतीत अस्थिरता आहे. जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे आज भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण पहायला मिळाली आहे. आज 22 कॅरेट 10 ग्राम सोन्याची किंमत 46,100 जी मागील ट्रेडमध्ये 46,700 होती. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीही घसरल्या असून मागील ट्रेंडमध्ये 58,900 रुपये प्रति किलो असलेली चांदी आता 58,100 रुपये झाली आहे.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,130 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,320 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,290 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,130 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,320 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल? (Gold Price Today)
साधारणतः नागरिक सोन्याचे (Gold Price Today) दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी (Gold Price Today) दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
हे पण वाचा :
LPG Gas Booking वर मिळवा ₹70 चा कॅशबॅक, अशा प्रकारे करा बुकिंग
Investment Tips : अल्पावधीत मोठा नफा कमवायचा आहे ??? या पर्यायांकडे असू द्यात लक्ष
Bank Of India च्या खातेधारकांसाठी आनंदाची बातमी !!! आता FD वर मिळणार 7.75% व्याज
Pan Card वरील क्रमांकाचा अर्थ काय आहे ??? घरबसल्या अशा प्रकारे तपासा