हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमती वाढण्याचा कल या आठवड्यातही सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे घरगुती दर प्रति दहा ग्रॅम 52,435 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1,981.10 च्या शिखरावर आहे. गेल्या व्यापारी सत्रात सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 52,414 रुपये होते. याशिवाय चांदीही 8 वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली असून त्याची किंमत 67,560 रुपये प्रति किलो झाली आहे. तज्ञांचे याबाबत असे मत आहे की, सोन्या-चांदीतील तेजी कायम राहील आणि लवकरच सोन्याच्या दहा ग्रॅमसाठी 53,000 रुपये आणि चांदी 70,000 प्रति किलो पर्यंत पोहोचू शकेल.
आता पुढे काय होईल
अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे अमेरिकन डॉलर कमकुवत होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणूनच सोन्याच्या किंमतींमध्ये तीव्र वाढीचा कल दिसून येतो आहे. त्याच वेळी, यूएस बाँडच्या उत्पन्नामध्येही तीव्र घट झालेली आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीची खरेदी सुरू केली आहे.
दिवाळीपर्यंत सोने 55 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते – सीएनबीसी-आवाजने एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात सामील झालेल्या 40 टक्के लोकांचे असे म्हणणे आहे की दिवाळीपर्यंत सोने 55000 च्या पातळीला भिडू शकते. त्याचबरोबर, 30 टक्के लोक असे म्हणतात की दिवाळीपर्यंत सोन्याने 53000-54000 ची पातळी गाठणे सहज शक्य आहे. त्याचवेळी 30 टक्के लोक 51000 रुपयांच्या पातळीच्या बाजूने आहेत.
सोन्याबद्दल तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या
दिवाळी पर्यंत चांदी कुठे असेल? या प्रश्नाच्या उत्तरात 70 टक्के लोक म्हणाले की चांदीची 65000-68000 ची पातळी दिवाळीपर्यंत शक्य आहे. दिवाळीपर्यंत चांदी 70,000 च्या पातळीवर जाऊ शकते, असे 20 टक्के लोकांचे मत आहे. त्याचबरोबर, दहा टक्के लोकांचे असे मत आहे की दिवाळीपर्यंत चांदीने 63000 ची पातळी गाठणे शक्य आहे. सोने किंवा चांदी पैकी कशात गुंतवणूक करणे चांगले आहे? या प्रश्नावर 90 टक्के लोक म्हणाले की चांदीमध्ये गुंतवणूक करणे चांगले आहे. त्याच वेळी, 10 टक्के लोकांनी सोन्याचे समर्थन केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.