नवी दिल्ली । कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस आल्याच्या वृत्तामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री सुरू केली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीही खाली आल्या आहेत. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 1049 रुपयांची घसरण झाली आणि एक किलो चांदीची किंमत 1588 रुपयांनी घसरली. तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने सोन्याच्या किंमतींवर दबाव वाढला आहे. त्याशिवाय या महिन्यात गोल्ड ईटीएफची होल्डिंग 10 लाख औंसने खाली आली आहे. यावरून हे सूचित होते की, गुंतवणूकदार हळूहळू सोन्यातील होल्डिंग कमी करीत आहेत. परकीय बाजारात सोन्याच्या किंमती 4 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत.
सोन्याचे नवीन दर
राजधानी दिल्लीत आज प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,049 रुपयांनी घसरून 48,569 रुपयांवर आली आहे. सोमवारी एका दिवसाच्या व्यापारानंतर तो 49,618 वर बंद झाला. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 1,830 डॉलरवर आली आहे.
चांदीचे नवीन दर
एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदी 1,588 रुपयांनी स्वस्त झाली. त्याचे दर प्रति किलो 59,301 पर्यंत खाली आले. याआधी, चांदीचा भाव सोमवारी व्यापार सत्रात 60,889 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात, प्रति औंस किंमत 23.42 डॉलर होती.
सोन्या-चांदीच्या किंमती का घसरत आहेत
एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी अॅनालिस्ट तपन पटेल, मोतीलाल ओसवाल व्हीपी रिसर्चचे नवनीत दमानी यांचे म्हणणे आहे की, सोन्याच्या किंमती अपेक्षेपेक्षा जास्त घसरल्या आहेत. यामागचे कारण कोरोना लसबद्दल आलेली बातमी आहे. कारण कोरोना लस लागू झाल्यानंतर, जगभरातील आर्थिक रिकव्हरीस पुन्हा वेग येईल. म्हणूनच, सोन्या संदर्भात सुरू असलेली सुरक्षित गुंतवणूकिची मागणी कमी होईल.
अॅस्ट्रॅजेनेकाने सोमवारी आपल्या कोरोना लसीबद्दल सांगितले की, ते ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या भागीदारीने विकसित केली आहे. ही लस इतर कंपन्यांच्या कोरोना लसपेक्षा खूपच स्वस्त आहे आणि 90% पर्यंत प्रभावी आहे.
या बातमीनंतर सोन्याची सुरक्षित गुंतवणूक मागणी कमी झाली आहे. दुसरीकडे, अशी बातमी आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन अमेरिकेचे पुढील ट्रेझरी सेक्रेटरी, फेडरल रिझर्व्हचे माजी अध्यक्ष जेनेट येलेन यांना बनवण्याची योजना आखत आहेत. या वृत्ताचे व्यावसायिकांनीही स्वागत केले आहे.
ब्रोकरेज फर्म अँजेल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार कोरोना लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने सोन्याच्या किंमतींवर दबाव आणला आहे. त्याशिवाय या महिन्यात गोल्ड ईटीएफची होल्डिंग 10 लाख औंसने खाली आली आहे. यावरून हे सूचित होते की, गुंतवणूकदार हळूहळू सोन्यातील होल्डिंग कमी करीत आहेत. परकीय बाजारात सोन्याच्या किंमती 4 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.