नवी दिल्ली । ज्यांनी नवीन कार खरेदी केली त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता स्क्रॅपिंग पॉलिसीअंतर्गत नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना ऑटोमोबाईल कंपनीकडून 5 टक्के सूट देण्यात येईल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मते, केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर केली गेली होती. जी लवकरच देशभरात लागू केली जाईल. या पॉलिसीमध्ये 4 टप्पे असतील असे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात, जर आपण आपले जुने वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी केले तर आपल्याला 5 टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल. या नवीन स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे आपल्याला किती फायदा होणार आहे ते जाणून घेऊयात.
या वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असेल
स्क्रॅपिंग पॉलिसी लागू झाल्यानंतर 20 वर्षांचे खासगी वाहन आणि 15 वर्ष जुन्या व्यावसायिक वाहनासाठी फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असेल. गडकरी म्हणाले- यासाठी automated fitness centres पीपीपी मोडमध्ये सुरू केली जातील. ज्यामुळे देशातील रोजगारही वाढेल.
स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे वाहन क्षेत्राची वाढ होईल
सध्या देशातील वाहन क्षेत्रातील सुमारे साडेचार लाख कोटी रुपयांचा वार्षिक व्यवसाय आहे. गडकरी यांच्या म्हणण्यानुसार, स्क्रॅपिंग पॉलिसी लागू झाल्यानंतर ऑटो सेक्टरचा व्यवसाय वर्षाकाठी सुमारे दहा लाख कोटी रुपयांवर जाईल. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, यामुळे देशात 50 हजाराहून अधिक रोजगार वाढतील.
नवीन वाहनांची किंमत 30 ते 40 टक्क्यांनी कमी करण्यात येईल
केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार ऑटो सेक्टरला आता नवीन वाहनांच्या निर्मितीसाठी पोलाद, रबर, अॅल्युमिनियम आणि रबर आयात करावे लागतील. ज्यामुळे नवीन वाहनांची किंमत वाढते. त्याच वेळी ते म्हणाले – स्क्रॅपिंग धोरण लागू झाल्यानंतर स्टील, रबर, अॅल्युमिनियम आणि रबर आयात करण्याची गरज भासणार नाही. ज्यामुळे वाहनांच्या किंमती 30 ते 40 टक्क्यांनी कमी होतील.
जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स आकारला जाईल
स्क्रॅपिंग पॉलिसी व्यतिरिक्त, 8 वर्ष जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याची सरकारची योजना आहे. याद्वारे जो महसूल गोळा केला जाईल त्याचा उपयोग प्रदूषण रोखण्यासाठी केला जाईल. या योजनेंतर्गत आठ वर्षापेक्षा जुन्या व्यावसायिक वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट आणि नूतनीकरणाच्या वेळी रोड टॅक्सच्या 10-25 टक्के दराने टॅक्स आकारला जाऊ शकतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.