नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकने (ICICI Bank) आता ग्राहकांना चांगली सोय देत गुगल पे (Google Pay) बरोबर भागीदारीची घोषणा केली आहे. ज्याद्वारे आता ग्राहकांना त्यांचा FASTag गूगल पेद्वारे मिळू शकेल. बँकेचे ग्राहक Google Pay App मध्ये रजिस्टर्ड UPI मार्फत FASTag खरेदी करू शकतात. यामुळे युझरला पेमेंट App वरच UPI मार्फत आयसीआयसीआय बँक FASTag चे डिजीटल ऑर्डर, ट्रॅक आणि रिचार्ज करण्याची सुविधा मिळेल.
बँकेच्या या उपक्रमामुळे ग्राहकांची सुरक्षा सुनिश्चित होईल. तसेच आता FASTag खरेदी करण्यासाठी त्यांना टोल प्लाझा किंवा इतर कोणाकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. या घोषणेसह, आयएसआयसीआय बँक FASTag जारी करण्यासाठी Google पे सह भागीदारी करणारी पहिली बँक बनली. हा उपक्रम FASTag साठी डिजिटल पेमेंट आणखी मजबूत करेल.
नुकतीच आयसीआयसीआय बँकेने मुंबई टोल प्लाझा आणि हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्किंग झोनमध्ये प्रवाश्यांसाठी FASTag एकत्रीत केले आहे. आयसीआयसीआय बँकेने 2013 मध्ये प्रथम मुंबई-वडोदरा कॉरिडोरवर FASTag सेवा सुरू केली. फास्टॅग इलेक्ट्रॉनिक टोलिंग हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्पातील एक भाग आहे.
या द्वारे मिळवा Google Pay FASTag-
> यासाठी तुम्हाला आधी तुमच्या मोबाईलमध्ये Google Pay उघडावा लागेल.
> येथे आल्यानंतर तुम्हाला ICICI Bank FASTag वर क्लिक करावे लागेल.
> येथे आपल्याला Buy New FASTag लिहिलेले दिसेल.
> ते उघडल्यानंतर तुम्हाला पॅन क्रमांक, आरसी कॉपी, वाहनाचा क्रमांक आणि पत्त्याचा तपशील भरावा लागेल.
> तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर OTP द्वारे व्हेरिफाय लागेल.
> पेमेंट दिल्यानंतर ऑर्डर येते.
आयसीआयसीआय बँक व्यतिरिक्त इतर ग्राहकही अशा प्रकारे घेऊ शकतील लाभ
जे युझर्स आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक नाहीत ते Pocket App चा वापर करून किंवा www.icicibank.fastag वर भेट देऊन FASTag खरेदी करू शकतात. आयसीआयसीआय बॅंकेच्या वतीने असे म्हटले गेले आहे की, गुगलवरील युझर्सना सर्व क्षेत्रात डिजिटल पेमेंट्स वाढविण्यासाठी यूपीआयमार्फत नवीन FASTag साठी अर्ज करण्यास मदत केली जाईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.