हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ईपीएफ खातेधारकांना दिलासा देण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे. कामगार मंत्रालयाने दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आता ईपीएफओ देशभरातील कार्यालयापैकी आपल्या कोणत्याही प्रादेशिक कार्यालयातून केलेले दावे निकाली काढण्यास सक्षम असेल. या नवीन उपक्रमांतर्गत भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, अर्धे पैसे काढणे आणि दावे व बदल्या अशा सर्व प्रकारच्या ऑनलाईन दाव्यांचा तोडगा काढू शकतील.
नवीन निर्णय काय असतील
समजा जर तुमचे कार्यालय मुंबईमध्ये असेल आणि तुमचे खातेही मुंबई पीएफ कार्यालयात असेल तर आधी तुमची पीएफ क्लेम सेटलमेंट ही मुंबईची होती. परंतु आता हे देशभरातील कोणत्याही ठिकाणाहून केले जाऊ शकते. कोरोना विषाणूमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण, बरीच पीएफ कार्यालये अद्याप ही बंदच आहेत.
मंत्रालयाने याबाबत म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे मुंबई, ठाणे, हरियाणा आणि चेन्नई विभागातील अनेक कार्यालये ही मर्यादित कर्मचार्यांवर कार्यरत आहेत, तसंच येणाऱ्या दाव्यांची संख्या देखील वाढलेली आहे.
आपल्या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, सध्या या कार्यालयांमध्ये प्रलंबित दाव्यांची संख्या बरीच वाढली आहे आणि त्यावर तोडगा निघण्यास उशीर होत आहे. अशा परिस्थितीत, सर्व कार्यालयांमध्ये क्लेम डिस्पोजलशी संबंधित कामं समान प्रमाणात वितरीत करून दाव्यांसाठीचा होणारा विलंब हा कमी केला जाईल.
निवृत्तीवेतनधारकांना देखील हे नियम सुलभ केले आहेत
एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) त्यांच्या पेन्शनधारकांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सामायिक सेवा केंद्रे (सीएससी) वापरेल, ही माहिती एका अधिकृत निवेदनात दिली आहे. आपली पेन्शन सुरू ठेवण्यासाठी ईपीएस पेन्शनर्सना दरवर्षी आपला लाइफ प्रूफ द्यावा लागतो.
सीएससी व्यतिरिक्त ईपीएस पेन्शनधारक हे १३५ क्षेत्रीय कार्यालये, ११७ जिल्हा कार्यालये आणि पेन्शन वितरित बँकांद्वारेही आपले लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकतात. ईपीएस पेन्शनधारक त्यांच्या सोयीनुसार यांपैकी एका एजन्सीची निवड करण्यास सक्षम असतील.
ईपीएफओने म्हटले आहे की सुमारे ६५ लाख निवृत्तीवेतनधारक ३.६५ लाखाहून अधिक सीएससीद्वारे आपला लाइफ सर्टिफिकेट देऊ शकतात. कामगार मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईपीएफओने विशेषतः कोविड -१९ साथीच्या वेळी कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेत (ईपीएस) अंतर्गत येणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना डोर-टू-डोर सर्व्हिस डिलिव्हरी देण्यासाठी सीएससीबरोबर भागीदारी केली आहे. याद्वारे पेन्शनधारक त्यांचे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट देऊ शकतात.
आपण जीवन प्रमाण पोर्टलवर आपले लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकता. यासाठी आपल्याला पेन्शन खात्यासह बँक शाखेत जाण्याची देखील आवश्यकता नाही.जीवन प्रमाण पोर्टलद्वारे आधार ई-वेरिफिकेशनला आपले लाइफ सर्टिफिकेट मानले जाईल. यासाठी प्रथम https://jeevanpramaan.gov.in/ वर जा.
पेन्शन कॉलममध्ये, आपले आधार ई-वेरिफिकेशन करा. वेरिफिकेशन नंतर, आपले डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार केले जाईल. हे सर्टिफिकेट आपल्या लाइफ सर्टिफिकेट रिपॉजिटरीत स्टोअर केले जाईल. जर बँकेत जाऊन आधार ई-वेरिफिकेशन केल्यास बँक अधिकारी आपल्या लाइफ सर्टिफिकेटच्या प्रिंटआउटवर सही करतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.