SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर, आता फसवणूक करून कोणालाही तुमच्या ATM मधून पैसे काढता येणार नाही !!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. SBI ने आपल्या ग्राहकांसाठी कॅश पैसे काढण्याच्या प्रक्रियेत आणखी एक पाऊल टाकले आहे. हे पाऊल प्रत्यक्षात सुरक्षा (Customer Safety) मजबूत करण्यासाठी आहे. आतापर्यंत एटीएम कार्ड क्लोन करून किंवा अन्य मार्गाने गुंड एटीएममधून पैसे काढत असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र आता असे होणार नाही.

आता एटीएम मशिनमधून पैसे काढताना तुम्हाला OTP ही टाकावा लागेल. हा OTP तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर मिळेल आणि तुमच्या एटीएम पिननंतर तो टाकणे आवश्यक असेल. जर तुम्ही हा OTP टाकला नाही तर तुम्ही पैसे काढू शकणार नाही. आता समजून घ्या की जर एखाद्याला तुमच्या कार्डमधून पैसे काढायचे असतील तर तो देखील तुमच्या परवानगीशिवाय पैसे काढू शकणार नाही, कारण आता तुमच्या मोबाईल नंबरवर येणारा OTP यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आणलेल्या या फिचरमुळे आता ग्राहकांच्या सुरक्षेसाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे. एटीएम वापरणेही आता पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, त्यांच्या ग्राहकांच्या कॅश रक्कम काढण्याबाबत सुरक्षेचा एक नवीन स्तर (लेयर) स्थापित करण्यात आला आहे.

इतर बँकेच्या एटीएमवर OTP आवश्यक नाही
हे फीचर फक्त आणि फक्त SBI ATM मशीनवरच काम करेल. तुम्ही SBI चे ग्राहक असाल आणि इतर कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असाल तर हे फीचर काम करणार नाही. याचा अर्थ असा की, तुम्ही इतर कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढले तर तुम्हाला OTP टाकण्याची गरज नाही.

हे नवीन फीचर नॅशनल स्विच (NFS) ने विकसित केले आहे. हे देशातील सर्वात मोठे इंटरऑपरेबल एटीएम नेटवर्क आहे. हे देशांतर्गत इंटर -बँक एटीएम ट्रान्सझॅक्शनपैकी 95 टक्क्यांहून जास्त हाताळते.

कसे काम करेल ?
>>सर्व प्रथम तुम्हाला SBI बँकेच्या ATM मध्ये जावे लागेल.
>> पैसे काढण्याची प्रक्रिया आधीसारखीच पूर्ण करा.
>>शेवटी तुमच्या नंबरवर एक OTP येईल.
>> हा OTP मशीनच्या स्क्रीनवरील बॉक्समध्ये टाकावा लागेल.
>> यानंतर तुम्ही पैसे काढू शकाल.

Leave a Comment