नवी दिल्ली । तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचा PF कापला गेला असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी तुमच्या PF खात्यात 8.50 टक्के व्याज आले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO, रिटायरमेंट फंडशी संबंधित संस्था, त्यांनी सांगितले की,”त्यांनी आतापर्यंत 6.47 कोटी खात्यांमध्ये व्याज जमा केले आहे.” तुम्हाला हे पैसे आतापर्यंत मिळाले आहेत की नाही हे तुम्ही तुमचे PF खाते देखील तपासले तर बरे होईल. तुम्ही घरबसल्या तुमच्या PF खात्याचा बॅलन्स तपासू शकता.
मिस्ड कॉलद्वारे
तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या. यानंतर EPFO कडून एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुमच्या PF खात्याची माहिती मिळेल. हा SMS UAN च्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून पाठवावा लागेल.
sms द्वारे
जर तुमचा UAN EPFO मध्ये रजिस्टर्ड असेल, तर तुमचे नवीन काँट्रीब्युशनच्या बॅलन्सची माहिती मीसेजद्वारे मिळू शकते. यासाठी तुम्हाला EPFOHO UAN ENG 7738299899 वर पाठवावे लागेल. शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत. तुम्हाला हिंदीत माहिती हवी असेल तर तुम्ही EPFOHO UAN HIN लिहून पाठवू शकता. हा एसएमएस UAN च्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून पाठवावा लागेल.
6.47 crore accounts have been credited with an interest of 8.50% for the FY 2020-21. Next update on 15-11-2021. @LabourMinistry @esichq @PIB_India @byadavbjp @Rameswar_Teli @wootaum
— EPFO (@socialepfo) November 12, 2021
EPFO वेबसाइटद्वारे
यासाठी तुम्हाला EPFO च्या वेबसाइटवर जावे लागेल.
येथे Employee Centric Services वर क्लिक करा.
आता View Passbook वर क्लिक करा.
पासबुक पाहण्यासाठी UAN ने लॉग इन करा.
UMANG App द्वारे
तुमचे UMANG App उघडा आणि EPFO वर क्लिक करा.
आता Employee Centric Services वर क्लिक करा.
येथे View Passbook पर्यायावर क्लिक करा.
तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड (OTP) नंबर टाका.
रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर OTP येईल.
OTP टाकल्यानंतर तुम्ही तुमची PF बॅलन्स तपासू शकता.