खूशखबर! ५ करोड नोकरदारांच्या PF खात्यात १५ मे पर्यंत जमा होणार पैसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिटायरमेंट फंड संस्था एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) ने कोरोनाव्हायरस या महामारीच्या उद्रेकामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांना दिलासा दिला आहे. त्याअंतर्गत आता मार्च १५ पर्यंत EPF भरू शकतात.यामुळे ६ लाख कंपन्यांना आणि ५ कोटीहून अधिक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. ईपीएफओच्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये मार्च महिन्यामध्ये भरण्यात येणारी रक्कम १५ एप्रिलपर्यंत देणे आवश्यक होते. ते आता वाढवून १५ मे पर्यंत केलेले आहे. कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “कोरोना विषाणूमुळे आणि लॉकडाऊनमुळे ओढावलेल्या परिस्थितीमुळे मार्च महिन्यासाठी इलेक्ट्रॉनिक चलान कम रिटर्न (ईसीआर) सादर करण्याची तारीख १५ मे २०२० आहे.” हे त्या मालकांसाठी आहे, ज्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना मार्च महिन्याचा पगार दिलेला आहे.

निवेदनानुसार मार्च २०२० ची ईसीआर सादर करण्याची अंतिम तारीख साधारणपणे १५ एप्रिल २०२० अशी आहे. अशा प्रकारे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध कायदा १९५२ (ईपीएफ आणि एमपी कायदा) अंतर्गत येणाऱ्या आस्थापनांना या वर्षाच्या मार्च महिन्यासाठी देय रक्कम आणि प्रशासकीय फी जमा करण्यासाठी अतिरिक्त ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. कामगार व रोजगार मंत्रालयाच्या या निर्णयामुळे ज्यांना यावर्षी मार्चपर्यंत आपल्या कर्मचार्‍यांच्या पगाराचे वितरण करण्यात आले आहे त्यांना दिलासा मिळणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या वेळी मालकांनी कर्मचार्‍यांचे पगार देणे हे एक प्रोत्साहनच आहे.

६ लाख कंपन्या आणि ५ कोटी भागधारकांना ईसीआर भरण्यासाठी एका महिन्याच्या स्थगितीचा फायदा होईल.ईसीआर सबमिट करताना मालकांना मार्च महिन्याच्या पगाराच्या वितरणाची तारीख देणे करणे आवश्यक आहे. ज्या मालकांनी आपल्या कर्मचार्‍यांना मार्च महिन्याचा पगार दिला आहे त्यांना फक्त ईपीएफ थकबाकी भरण्यासाठीच अतिरिक्त वेळ देण्यात आलेला नाही तर १५ मे रोजी किंवा त्यापूर्वी जमा केल्यास व्याज आणि दंडासाठी देखील काहीही दयावे लागणार नाही आहे.

Today's top business news: EPFO cuts interest rate on deposits to ...

.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ३ हजार पार..

सोन्याच्या किंमतीने मोडले सर्व रेकोर्ड, जाणुन घ्या आजचे भाव

SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

धक्कादायक! सोलापूरात कोरोनाचे १० नवे रुग्ण

खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

Leave a Comment