हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google : सध्याचे जग हे इंटरनेटचे आहे. या वाढत्या तंत्रज्ञानाच्या काळात आपल्याला अनेकदा इंटरनेटवर अशा काही गोष्टी नजरेत पडतात जे पाहून थक्क व्हायला होते. लोकांकडून अनेकदा त्यांना एडल्ट मेसेज किंवा सेक्सुअल कंटेंटच्या नोटिफिकेशन मिळत असल्याबाबत तक्रार केली जाते. अशा स्थितीत आपल्याकडून कुठे चूक झाली हे समजत नाही. मात्र प्रत्यक्षात असे का घडते याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
हे लक्षात घ्या कि, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि Google कडून आपल्याला एडल्ट मेसेज किंवा सेक्सुअल कंटेंटच्या नोटिफिकेशन मिळत असेल तर ते त्याच्या अल्गोरिदममधील बदलामुळे असे होते. हे अल्गोरिदम युझर्सच्या हालचालीनुसार काम करते. म्हणजेच जर आपण Google वर जे काही सर्च करता किंवा पाहता त्या आधारावर आपल्याला जाहिराती आणि कन्टेन्ट दाखवले जातात.
हे लक्षात घ्या की, एका भारतीय युझर कडून त्याच्या फोनवर सरासरी 4 ते 5 तास घालवले जातात. अशा परिस्थितीत आपण ऑनलाइन काय सर्च करतोय हे महत्त्वाचे ठरते. कारण आपण सर्च करत असलेले कंटेन्ट आपल्या सर्च शिफारसीचा आधार बनते. कारण प्लॅटफॉर्मचे अल्गोरिदम अशा प्रकारे काम करते.
याचा अर्थ आपण काय सर्च करतोय किंवा कोणत्या प्रकारचे कंटेंट पाहतोय याची संपूर्ण माहिती त्यांच्याकडे जाते. त्यानुसार या प्लॅटफॉर्मकडून आपल्याला नोटिफिकेशन पाठवल्या जातात कारण त्यांचे अल्गोरिदम तशा प्रकारे काम करते. Google
अनेक वेळा युझरकडून विचारणा केली जाते की, त्यांनी असे काहीही सर्च केलेले नसताना त्यांना अशा जाहिराती, नोटिफिकेशन किंवा मेसेजेस का येतात ??? तर अशा परिस्थितीत असे होऊ शकते की युझर्स कडून चुकून काही एडल्ट कंटेन्टवर क्लिक केले गेले असेल जे अल्गोरिदमद्वारे ट्रॅक केले गेले आणि ज्यानंतर आपल्याला त्याच्याशी संबंधित नोटिफिकेशन किंवा मेसेजेस मिळू लागले. Google
नोटिफिकेशन्सच्या बाबतीत, असे होऊ शकते की आपण कधीतरी एखाद्या वेबसाइटवर गेला असाल आणि आपल्याकडून चुकून पॉप-अपमध्ये येणाऱ्या ‘नोटिफिकेशन’ वर क्लिक केले गेले असेल, ज्यामुळे त्याचे सबस्क्रिप्शन ऑन झाले आणि आपल्याला नोटिफिकेशन मिळू लागले. मात्र, आपल्याला सदर वेबसाइटला व्हिसिट करून ते बंद देखील करता येतील. Google
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.google.co.in/
हे पण वाचा :
E-Shram : ‘या’ सरकारी योजनेमध्ये कामगारांना दिला जातो 2 लाख रुपयांचा मोफत विमा !!!
Tokenization of cards : 1 ऑक्टोबरपासून बदलणार कार्ड पेमेंटशी संबंधित ‘हे’ नियम !!!
ग्राहकांचा डेटा विकून IRCTC कमावणार कोट्यवधी रुपये, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
भक्तांच्या सोयीसाठी रेल्वे सुरु करणार Ganpati Special Trains, लिस्ट तपासा
फिजिकल गोल्डप्रमाणे Sovereign Gold Bonds वर देखील कर्ज मिळेल का ???