हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या कुटुंबियातील वाद हा सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. पवार कुटुंबातील आता तरी सदस्याचे नाव पडलकरासमोर आले कि पडळकर चांगलेच आक्रमक होतात. आज पडलकरांनी आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या रोहित पवारांना संघर्ष शब्दाचा अर्थतरी कळतो आहे. रोहित पवारांनी असा कोणता संघर्ष केला आहे, की ते ‘संघर्ष’ नावाचं पुस्तक वाटत आहेत, असा हल्लाबोल पडळकरांनी केला.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात ‘संघर्ष’ नावाच्या पुस्तकाचे वाटप केले. यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. पडळकर म्हणाले की, आज हे लोक शाहू-फुले-आंबेडकरांची पुस्तकं वाटत आहेत.
कुटूंबातील काका-पुतण्या, मुलगी-नातू राजकारणात
मात्र, शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेण्याची पात्रता पवार कुटुंबियांची नाही. ज्या पवारांनी चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगलं, त्यानंतर त्यांचाच पुतण्या या राज्याचा उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री आणि अर्थमंत्री होतो आहे. त्यांचीच मुलगी परत खासदार होते, त्यांचाच नातू परत आमदार होतो, हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या कोणत्या पुस्तकात लिहिले आहे?
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेची घटनाच बदलली
यावेळी पडळकरांनी ळ. शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की,कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहूजनाच्या मुलांना शिक्षण मिळावं, यासाठी रयत शिक्षण संस्थ्येची स्थापना केली होती. प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री हा रयत शिक्षण संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष राहील, हे या संस्थेच्या घटनेत लिहिले होते. मात्र, शरद पवारांनी ही घटना बदलली. याचे नेमकं कारण काय होतं? पदाचा गैरवापर करण्यात पवार कुटुंबीय पुढे आहे, असा आरोप पडलकरांनी केला.