हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज सांगली येथे अहिल्यादेवी स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमावरून शरद पवारांवर हल्लाबोल केला. “शरद पवार यांच्याहस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पवार यांचे काम हे अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारसरणीच्या उलटे आहे. अहिल्यादेवींनी देश, धर्म यासाठी काम केले. जेव्हा जेव्हा या देशात आक्रमण झाली. आणि या देशातील हिंदूंची मंदिरे उध्वस्थ केली गेली. त्या सर्व मंदिरांचे जीर्णोद्धार करण्याचे काम अहिल्यादेवी यांनी केले. मात्र, शरद पवार देवच मानत नाहीत. त्यामुळे आम्ही राजकीय व्यक्तीच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण होऊ देणार नसल्याचा इशारा पडळकर यांनी दिला.
गोपीचंद पडळकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकारण केले जात आहे. आमची हीच मागणी आहार. याला स्थानिक नगरसेवक व नागरिकांचा विरोध आहे. वास्तविक मेंढपाळांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण होणे आवश्यक आहे.
ज्या अहिल्यादेवींनी देश, देव आणि धर्मांसाठी काम केले. यांच्या विचारसरणीच्या उलटे काम हे पवारांचे आहे. या कारणामुळे आमचा या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याचं विरोध असून तो आम्ही करणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत अहिल्यादेवी स्मारकाचा लोकार्पण सोहळा हा २७ मार्च रोजी आमही करणार आहोत, असा इशारा यावेळी पडळकर यांनी दिला.