मुंबई प्रतिनिधी | वंचितला सोडचिठ्ठी दिलेले धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडलकरांना बारामतीतून मैदानात उतरवण्याचे संकेत दिले आहेत.
गोपीचंद पडळकर वाघ आहेत. त्यांनी जंगलाचा राजा असल्या सारखे राहिले पाहिजे. गोपीचंद पडळकरांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे आपण पडळकरांना बारामतीतून उमेदवारी मिळण्यासाठी पक्षाकडे मागणी करणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
गोपीचंद पडळकर यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर बारामती मतदारसंघात चुरशीची लढत बघायला मिळणार आहे. कारण मराठा धनगर मतदारांचे समान बलाबल असल्याने गोपीचंद पडळकर पवारांपुढे आव्हान उभा करणार आहेत. म्हणूनच बारामती विधानसभेची निवडणूक जर वेळीच्या निडणुकीपेक्षा वेगळी असणार आहे.