बनावट राशन कार्ड वर नाही मिळणार धान्य, या पद्धतीने व्हाल यादीतून बाहेर 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना भाग-२ अंतर्गत सरकार ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे अशांना देखील ५ किलो गहू आणि १ किलो हरभरा डाळ मोफत देत आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही योजना सुरु राहणार आहे. देशातील सद्यस्थिती आणि पुढे येणारे सण पाहता ही योजना वाढविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ८० कोटीपेक्षा अधिक लोकांना धान्य पुरविले जाणार आहे. पण यामध्ये काही बनावट राशन कार्डचे प्रकार समोर येत आहेत. ज्यावर कित्येक महिन्यापासून कुणी धान्य घेतलेले नाही. राशन कार्ड बनावट असेल तर धान्य मिळणार नाही. मध्यप्रदेश मध्ये कटनी मध्ये बनावट राशन कार्डवर धान्य मिळणार नाही अशी माहिती समोर आली आहे.

ज्या राशन कार्ड वर मागच्या ३ महिन्यापासून धान्य घेतले नाही आहे. अशा राशन कार्ड चे व्हेरिफिकेशन करून आणि दुसऱ्या औपचारिकता पूर्ण करून राशन कार्डवरून नाव काढून टाकले जाणार आहे. एका अहवालानुसार कटनी जिल्ह्यातील जवळपास १२ हजार कुटुंब ३ महिन्यापासून राशन घेत नाही आहेत. अशा राशन कार्ड ना बनावटी मानले जात आहे. जर हे योग्य असेल तर फार गडबड होईल. या गडबडी पासून वाचण्यासाठी राशन कार्ड आधार ला लिंक करणे अनिवार्य केले गेले आहे. संचारबंदी नंतर ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे अशा नागरिकांना मोफत राशन कार्ड देण्याची घोषणा सरकारने केली होती. सध्या दिल्ली सहीत काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या आदेशाचे पालन करत मोफत अन्न वाटणे सुरु केले आहे.

ही  योजना तीन महिन्यांसाठी सुरु करण्यात आली होती. मात्र नंतर नोव्हेंबर पर्यंत या योजनेला वाढविण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी या योजनेला नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यासाठी ९० हजार कोटी रु अतिरिक्त खर्च येईल असे सांगितले आहे. योजना सुरु  नोव्हेंबर पर्यंत दीड लाख कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येणार आहे. ज्या कामगारांनी राशन कार्ड बनविले नाही आहेत. त्यांना देखील प्रति व्यक्ती ५ किलो धान्य आणि १ किलो हरभरा डाळ नोव्हेंबर महिन्यापर्यंत दिले जाणार आहे. केंद्र सरकारने या योजनेचा ८ कोटी प्रवासी कामगारांना फायदा होत असल्याचे सांगितले आहे. काही राज्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म द्वारे या योजनेचा लाभ देत आहेत. दिल्ली सरकारने एक वेगळी ऑनलाईन सेवा सुरु केली होती, ज्यामध्ये अर्ज केल्यानंतर राशन मिळेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.