ग्रॅच्युइटीसाठीचा नियम ‘या’ नव्या कायद्यानंतर बदलला, आता कुणाला आणि कधी पैसे मिळणार ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेत तीन कामगार संहिता बिले (Labour Code Bills) मंजूर झाली आहेत. यामध्ये ऑक्यूपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडीशन बिल- 2020, इंडस्ट्रियल रिलेशन बिल- 2020 आणि सोशल सिक्योरिटी बिल- 2020 यांचा समावेश आहे. सोशल सिक्योरिटी बिल, 2020 चा चॅप्टर 5 मध्ये ग्रॅच्युइटीच्या नियमांची माहिती देण्यात आली आहे. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात….

सर्वप्रथम ग्रॅच्युइटी बद्दल माहिती घेऊ – एकाच कंपनीत दीर्घकाळ काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना पगार, पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी व्यतिरिक्त ग्रॅच्युइटीही दिली जाते. ग्रॅच्युइटी म्हणजे कंपनीकडून एखाद्या कर्मचार्‍यास मिळालेले बक्षीस. जर कर्मचार्‍याने नोकरीच्या काही अटी पूर्ण केल्या तर एखाद्या विहित सूत्रानुसार त्याला ग्रॅच्युइटीची हमी दिली जाईल. ग्रॅच्युइटीचा छोटा भाग कर्मचार्‍याच्या पगारामधून कट केला जातो, मात्र मोठा भाग कंपनीकडून दिला जातो.

नवीन नियम काय म्हणतो – सरकारने ठराविक मुदतीच्या कर्मचार्‍यांसाठी अर्थात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणार्‍यांसाठी ही व्यवस्था केली आहे. जरी एखाद्याने एका कंपनीकडे एक वर्षाच्या निश्चित मुदतीच्या कॉन्ट्रॅक्टवर काम केले तरीसुद्धा त्यांना ग्रॅच्युटी मिळते. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणार्‍या कर्मचार्‍याला आता नियमित कर्मचार्‍यांप्रमाणेच सोशल सिक्योरिट अधिकार देण्यात आले आहेत. कंत्राटी कर्मचार्‍यांव्यतिरिक्त हंगामी संस्थांमध्ये काम करणार्‍यांनाही हा लाभ देण्यात येईल.

याचा फायदा कोणाला मिळू शकेल – इतरांसाठी जुना नियमच कायम राहील. सध्या ग्रॅच्युइटी प्रत्येक वर्षाच्या 15 दिवसाच्या पगाराच्या आधारे पाच वर्षांची नोकरी पूर्ण झाल्यावर निश्चित केली जाते. कंपनीच्या वतीने कर्मचार्‍यांना ग्रॅच्युटी दिली जाते. त्याची कमाल मर्यादा 20 लाख रुपये असते. जर एखादा कर्मचारी एकाच कंपनीत 20 वर्षे काम करत असेल आणि त्याचा शेवटचा पगार 60 हजार रुपये असेल. तर हा पगार 26 ने विभागला जातो, कारण ग्रॅच्युइटीसाठी 26 दिवस मानले जातात. यातून 2,307 रुपये रक्कम मिळेल.

कंत्राटी कामगारांना लाभ मिळेल – निश्चित मुदतीच्या कर्मचार्‍यांसाठी किमान मुदतीची अट नाही – याअंतर्गत आता निश्चित मुदतीच्या कर्मचार्‍यांनाही ग्रॅच्युटी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आता किमान सेवा कालावधीसाठी कोणतीही अट नसेल. पहिल्यांदाच, ठराविक मुदतीसाठी काम करणाऱ्या कर्मचार्‍याला नियमित कर्मचार्‍याप्रमाणेच सामाजिक सुरक्षेचा अधिकार दिला आहे. फिक्स्ड टर्म हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना सूचित करते.

आता तुम्हाला ग्रॅच्युइटीचे पैसे कधी मिळतील – चॅप्टर 5 मध्ये असे म्हटले गेले आहे की, नोकरीच्या शेवटी कर्मचार्‍यांना सलग पाच वर्षे सेवा दिल्याबद्दल ग्रॅच्युइटी दिली जाईल. हे सेवानिवृत्ति, रिटायरमेंट किंवा राजीनामा, अपघात किंवा आजाराने मृत्यू किंवा अपंगत्व यावर असेल. मात्र, वर्किंग जर्नलिस्टच्या बाबतीत ते पाच वर्षांच्या ऐवजी तीन वर्षे असतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment