हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेच्या (ईपीएफओ) अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सर्व कंपन्यांचे मालक आणि कर्मचारी यांचे वैधानिक योगदान हे तीन महिन्यांसाठी मूळ वेतनाच्या १२ टक्क्यांवरून १० टक्के केले असल्याचे जाहीर केले आहे. कर्मचार्यांच्या खिशात अधिक पैसे टाकण्यासाठी आणि पीएफ (भविष्य निर्वाह निधी) च्या थकीत देयकामध्ये मालकांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात आले आहे. याद्वारे दोघांनाही एकूण ६,७५० कोटी रुपयांची रोकड उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर, ईपीएफला दिलेली मदत ही पुढील तीन महिन्यांसाठी देखील वाढविली जात आहे. ही मदत जून-जुलै-ऑगस्टपर्यंत सुरूच राहणार आहे. पहिले ही मदत मार्च, एप्रिल, मे पर्यंतच देण्यात आली होती.
हा निर्णय ईपीएफओच्या कार्यक्षेत्रातील सर्व संस्थांना लागू असेल. या निर्णयामुळे ४.३ कोटी कर्मचारी आणि ५.५ लाख कंपन्यांचे मालक यांना थेट फायदा होणार आहे जे की कोरोना विषाणूच्या साथीपासून बचावासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे.रोख रक्कमेच्या समस्येशी सामना करत आहेत.
केंद्र ऑगस्टपर्यंत १५ हजार रुपयांपेक्षा कमी असणाऱ्यांना ईपीएफ देईल
याशिवाय अर्थमंत्री यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या मदतीसाठी ऑगस्टपर्यंत आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याची घोषणा केली. याअंतर्गत, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये संघटित क्षेत्रातील कर्मचारी व कर्मचार्यांना देण्यात येणाऱ्या मूलभूत पगाराच्या एकूण २४ टक्के (कर्मचार्यांचे १२ टक्के आणि नियोक्तेचे १२ टक्के) सरकार देईल. यामुळे ३.६७ लाख मालक आणि ७२.२२ लाख कर्मचार्यांना दिलासा मिळणार आहे. सीतारामण यांच्यानुसार संघटित क्षेत्रातील ७२.२२ लाख कर्मचार्यांना आणि त्यांच्या मालकांना याचा २,५०० कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.
अर्थमंत्री पत्रकार परिषदेत म्हणाल्या, ‘तुम्ही काल पंतप्रधानांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा ऐकली, या पॅकेजवरील निर्णय समाजातील अनेक विभाग, अनेक मंत्रालये आणि विभागांमधील चर्चेनंतर घेण्यात आला. या पॅकेजवरील चर्चेत अनेक विभाग, मंत्रालयांव्यतिरिक्त स्वत: पंतप्रधान मोदीही सहभागी झाले होते.
MSME ना ३ लाख कोटी रुपये मिळतात
एमएसएमईंना तीन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. या व्यापाऱ्यांना ४ वर्षाची हमी न घेता कर्ज मिळेल. या चरणातील ४५ लाख छोट्या कंपन्यांना याचा फायदा होईल.MSME साठी एकूण ६ प्रमुख पावले उचलली गेली आहेत. तणावग्रस्त MSME किंवा कर्जबाजारी कंपन्यांसाठी ५० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कंपन्यांना पैसे देऊन त्यांना पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.