हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेबाबत केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आहे. पाटील यांनी आठवले यांच्यावर निशाणा साधला आहे. “आठवले म्हणजे भाजपचे कुणी निर्णायक नेते नाहीत. त्यांनी बोलण्याआधी भाजप तसेच शिवसेनेच्या नेत्यांची परवानगी घ्यावी. “आठवलेंचाच पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला आहे. ते काय शिवसेनेच्या भविष्यावर बोलतील,,” अशी टीका पाटील यांनी केली.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि मंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, रामदासआठवले यांनी शिवसेनेवर टीका करण्यापूर्वी विचार करावा, शिवसेनेबद्दल बोलताना अगोदर पक्षाची त त्यातील नेत्याची परवानगी घ्यावी. त्यांनी परवानगी दिल्यानंतरच मग बोलावे.
काय केली होती आठवले यांनी टीका?
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शिवसेनेबाबत नुकतीच भविष्यवाणी करत टीका केली होती. ते म्हणाले होते की, “शिवसेना स्वबळावर लढली तर शिवसेनेचे तीन चार खासदारही निवडून येणार नाही. शिवसेनेची परिस्थिती काँग्रेससारखी झाली आहे.