पुण्यात भरदिवसा गोळीबार!! भारती विद्यापीठ परिसरातील घटनेने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | पुणे येथील भारती विद्यापीठ परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रभागा हाँटेल समोर दोघांनी दुचाकीवरून येऊन एका व्यक्तीवर भरदिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये संबंधित व्यक्तीचा जागेवर मृत्यू झाला असून या घटनेनंतर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आणि  पोलिसांनी  ताबडतोब नाकाबंदी केली आहे.

मृत पावलेला व्यक्ती समीर मनूर शेख हा कांग्रेस कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून आरोपीने तब्बल 6 गोळ्या झाडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर हा चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला असता तिघांनी दुचाकीवरून येत सहा गोळ्या फायर केल्या. या फायरींगमध्ये समीरचा जागीच मृत्यू झाला आहे.

हा गोळीबार कशामुळं झाला हे अद्याप समोर आ नाही. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून परिसरातील सीसीटीव्ही फटेजमध्ये काही मिळतंय काय हे तपासत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांकडून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे