हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारत आणि आयर्लंड यांच्यातील T20 मालिकेतील दोन सामन्यांच्या पहिल्या सामन्यात भारतानं आयर्लंडचा 7 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. भारताने काल दीपक हुडा, इशान आणि हार्दिकच्या (Hardik Pandya) तुफान खेळीवर सामना जिंकला. कालच्या सामन्यात पावसाने मोठ्या प्रमाणात व्यत्यय आणला. पाऊस असल्यानं जवळपास अडीच तासानंतर सामना सुरू होण्यास उशीर झाला. यामुळे पंचानी षटके कापून सामना 12-12 षटकांचा केला. विलंबाने सुरू झालेल्या सामन्यात भारतीय चाहत्यांचा उत्साह मात्र कमी केला नाही. 11.20 मिनिटांनी सुरू झालेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या 8 चेंडूंत आयर्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. भुवनेश्वर कुमार व कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी हे धक्के देताना विक्रमाची नोंद केली.
BOWLED!! #IREvIND
Bhuvneshwar Kumar gets the first breakthrough for #TeamIndia, Andrew Balbirnie gone for duck! pic.twitter.com/0s6QZGsxbh
— Doordarshan Sports (@ddsportschannel) June 26, 2022
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पुन्हा पावसामुळे तीन तासांचा खेळ वाया गेला. पावसामुळे बराच वेळ वाया गेला. त्यामुळे हा सामना 12-12 षटकांचा खेळवण्यात आला. त्यानुसार 1 ते 4 षटकं पॉवर प्ले राहणार आहे. तीन गोलंदाजांना प्रत्येकी दोन, तर दोन गोलंदाजांना प्रत्येकी 3 षटकं फेकता येणार आहेत. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात कमाल दाखवली. त्याने पाचव्या चेंडूवर अँडी बालबर्नीचा त्रिफळा उडवला. 6व्या चेंडूवर गॅरेथ डेलनीच्या LBW साठी जोरदार अपील झाले अन् DRS ही घेतला गेला, परंतु तो वाया गेला. दुसऱ्या षटकात हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टाकलेला पहिला चेंडू पॉल स्टर्लिंगने कव्हरच्या दिशेने सीमापार पाठवला. पुढचा चेंडूवर त्याने उत्तुंग फटका मारला, परंतु दीपक हुडाने अलगद झेल घेतला.
अशी कामगिरी करणारा हार्दिक भारताचा पहिलाच कर्णधार
कालच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक 34 विकेट्स घेण्याच विक्रम भुवनेश्वर कुमारने केला. यावेळी त्याने वेस्ट इंडिजचा लेगस्पिनर सॅम्युअल बद्री व न्यूझीलंडच्या टीम साऊदीला मागे टाकले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त गोलंदाजी करणारा आणि विकेट मिळवणारा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला आहे.
हे पण वाचा :
शिवसैनिक आक्रमक!! श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले
आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं
हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल
साताऱ्यात आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन
मुंबईत 10 जुलै पर्यंत जमावबंदी लागू