HDFC Bank कडून RD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या HDFC Bank कडून रिकरिंग डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यात आली ​​आहे. बँकेने आपल्या निवडक कालावधीच्या व्याजदरात 50 बेस पॉइंट्सपर्यंत वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाईटवरील माहिती नुसार, 11 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत. यानंतर आता बँकेच्या 6 ते 36 महिने आणि 90 ते 120 महिन्यांच्या RD वरील व्याजदरात वाढ झाली आहे.

HDFC Bank news: HDFC Bank receives Rs 30,000 crore prepayments amid signs of economic recovery, deleveraging - The Economic Times

या दर वाढीनंतर आता बँकेकडून सामान्य नागरिकांना 6 महिने ते 120 महिन्यांच्या कालावधीसाठी RD वर 4.25% ते 6.10% व्याजदर दिला जाईल. हे लक्षात घ्या कि, HDFC Bank ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज देत आहे. तसेच आता बँक 6 महिने ते 120 महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना RD वर 4.75% ते 6.75% व्याजदर देईल.

The 20% growth principle that built HDFC Bank | Mint

नवीन दर तपासा

HDFC Bank कडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइट वरील माहिती नुसार 11 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. या नंतर आता एचडीएफसी बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या RD वर सामान्य नागरिकांना 3.00% ते 6.00% पर्यंत तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 6.75% पर्यंत व्याज दर देईल.

Post-merger bumps are not ruled out for HDFC Home Finance and HDFC Bank

RD आणि FD मधील फरक जाणून घ्या

रिकरिंग डिपॉझिट्स आणि फिक्स्ड डिपॉझिट्स जवळपास सारखेच असतात, मात्र यामध्ये संपूर्ण रक्कम एकाच वेळी गुंतवण्याऐवजी मासिक आधारावर डिपॉझिट्स करता येतात आणि मॅच्युरिटीवर पैसे काढता येतात.

पगारदार लोकांसाठी RD मध्ये गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय आहे, कारण त्यांना फिक्स्ड डिपॉझिट्सप्रमाणेच एकरकमी रक्कम गुंतवावी लागत नाही. RD मध्ये, गुंतवणूकदाराला दरमहा त्याच्या उत्पन्नाचा फक्त काही भाग गुंतवावा लागतो, ज्याची रक्कम आधीच निश्चित केलेली असते. HDFC Bank

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/resources/rates

हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून 184 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीच्या दरात वाढ
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा फ्री कॉलिंग अन् डेटा !!!
WhatsApp वर लवकरच मिळणार ‘हे’ 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने खरेदी करताय? पहा काय आहे यासाठीचा शुभ मुहूर्त