हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातिला शिंदे विरुद्ध ठाकरे गटातील सत्ता संघर्षांवर चांगलाच पेटला आहे. या सत्तासंघर्षात आता ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचे की 5 न्यायाधीशांकडेच ठेवायचे याचा निर्णयही मेरिटनुसार घेतला जाणार आहे. आता 3 दिवसांच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नुकवडणूक आयोगाने नुकताच आक महत्वपूर्ण निर्णय दिला. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. आयोगाच्या आदेशाविरोधात उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला आणि आयोगाचहा निर्णय व आदेश आपल्याला मान्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी धाव घेतली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या प्रकरणी सोमवारी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यास नकार दिला.
ठाकरेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज मंगळवारपासून पुढील तीन दिवस सुनावणी घेतली जाणार आहे. या सुनावणीत ठाकरे गटाच्या आणि शिंदे गटाच्या बाजूने काय निर्णय दिला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.