हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा असे दिसून येते की, आपल्या खात्यात किमान शिल्लक नसल्यामुळे बँकां ग्राहकांकडून दंड म्हणून मोठी रक्कम घेतात. ज्यांचे उत्पन्न कमी आहे त्यांना किमान 10 हजार रुपये शिल्लक ठेवण्यात सध्या अडचण होते आहे. देशातील अनेक बँका अशा लोकांसाठी झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट ऑफर करतात. झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट्स हे असे खाते आहे ज्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नसते. बर्याच बँकांमध्ये किमान शिल्लक मर्यादा ही 10 हजार रुपयांपर्यंत आहे. चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात …
(1) IDFC First Bank, फर्स्ट सेव्हिंग खाते – या झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्हाला कोणत्याही ATM मधून कितीही ट्रान्सझॅक्शन करण्याचा लाभ मिळतो. आपण मोबाइल बँकिंग आणि नेटबँकिंगची सेवा फ्रीमध्ये मिळवू शकता. आवश्यक कागदपत्रांसह कोणत्याही जवळील शाखेत जाऊन तुम्ही हे अकाउंट उघडू शकता. या बँकेच्या झिरो बॅलन्स खात्यास 6 ते 7% दराने व्याज मिळते.
2) Yes Bank, स्मार्ट सॅलरी एडवांटेज- या झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही एटीएममधून अमर्याद व्यवहार तसेच इतर ATM मधून 5 वेळा फ्री ट्रान्सझॅक्शन करू शकता. तसेच मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगचा वापर करून तुम्ही अमर्यादित अनलिमिटेड NEFT आणि RTGS करू शकता. यामध्ये तुम्हाला 4 ते 6 टक्के व्याज मिळेल.
(3) SBI, बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट- आपण हे अकाउंट व्हॅलिड KYC डॉक्युमेंटच्या मदतीने उघडू शकता. यामध्ये बँक तुम्हाला रुपे ATM कम डेबिट कार्ड देखील देईल, ज्यामुळे तुम्हाला ATM मधून पैसेही काढता येतील. यामध्ये तुम्हांला दर महिन्याला SBI च्या ATM मधून किंवा इतर बँकांच्या ATM मधून 4 वेळा कॅश विनाशुल्क काढता येईल. तसेच या बँक खात्यात ठेवलेल्या पैशांवर तुम्हाला वार्षिक दराच्या 2.75 टक्के दराने व्याज देखील मिळेल.
(4) IndusInd Bank,इंडसइंड ऑनलाइन सेव्हिंग अकाउंट – या ऑनलाइन सेव्हिंग अकाउंटमध्ये अनलिमिटेड ATM ट्रान्सझॅक्शनही उपलब्ध आहेत. तसेच मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या सेवाही फ्री मध्ये मिळत आहेत. ऑनलाईन एप्लिकेशन द्वारे तुम्ही आधार आणि पॅन कार्ड देऊन तुम्ही झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट उघडू शकता. यामध्ये तुम्हाला 4 ते 6 टक्के व्याज मिळेल.
(5) Kotak Mahindra Bank, 811 डिजिटल बँक अकाउंट – या बँक खात्यात तुम्हाला किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही. आपण हे अकाउंट डिजिटल बँकिंग वापरून उघडू शकता. यामध्ये तुम्हाला 811 व्हर्च्युअल डेबिट कार्डही मिळेल, जे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग, बिल पेमेंट आणि डीटीएच रिचार्जसाठी वापरू शकता. या बँक खात्यात आपल्याला 4 टक्के व्याज मिळते….
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.