गृहमंत्र्यांचा संभाजीराजेंना फोन; सरकार पाळत ठेवत असल्याचा आरोपावर म्हणाले..

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर अनेक ठिकाणी संताप व्यक्त केला जात होता. त्यामध्ये मराठे नेतेदेखील आक्रमक झाले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यानी ट्विट करून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे आहे. राज्याचा इंटेलिजन्स विभाग पाळत ठेवत असल्याचा संशय संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या ट्विटने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.

खासदार संभाजीराजे हे सध्या तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यादरम्यान समुद्र खवळलेला असल्यामुळे त्यांना किल्ल्यावर जाता आले नाही. यादरम्यान त्यांनी ट्विट करत सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. तसेच मला हेच लक्षात येत नाही की, माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कर्यकर्त्यावर हेरगिरी करुन काय साध्य होणार, असा सवाल खासदार संभाजीराजे यांच्याकडून करण्यात आला होता.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्पष्टीकरण
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करून छत्रपती संभाजी राजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता.असे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच त्यांनी संभाजीराजे यांना फोन करून आमचा हेरगिरीचा कळताच उद्देश नव्हता असे सांगितले आहे.

संभाजीराजे यांचे स्पष्टीकरण
मला आताच गृहमंत्री यांचा फोन आला होता. खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकी चे ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबर मध्ये येण्याची चूक झाली. परंतु त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसे केले असावे.त्यामुळे मी सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर समाधानी असून हा विषय हिकडेच संपला आहे असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.