हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी वसतिगृहाच्या चौकीदाराने बलात्कार करून मुलीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या करत संपवून घेतलं. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी हॉस्टेल व्यवस्थापनावर मोठा गंभीर आरोप केला आहे. सदर आरोपी वारंवार मुलीचा छळ करत होता आणि वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी मुलीच्या तक्रारींवर कधीही कारवाई केली नाही असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. ओम प्रकाश कनोजिया (वय ३०) असे सदर वॉचमॅनचे नाव असून दक्षिण मुंबईतील मुलींच्या वसतिगृहात तो काम करत होता. सोमवारी रात्री मुलीच्या खोलीत जाऊन त्याने तिच्यावर बलात्कार आणि नंतर तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.
याबाबत पोलिसानी सांगितले कि, मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार आम्ही चौकशी करत आहोत, एके दिवशी पहाटेच्या वेळेस वॉचमॅनचे मुलीच्या खोलीत जबरदस्ती केली, आणि वसतिगृहातील मुलीच्या मैत्रिणीने सुद्धा या घटनेला दुजोरा दिला. सदर पीडित मृत मुलगी चौथ्या मजल्यावर तिच्या खोलीत झोपली होती तेव्हा आरोपीने जाऊन जोरजोरात तिचा दार ठोठावायला सुरुवात केली. त्यावेळी पहाटेचे ५ वाजले होते आणि तिने दार उघडले तेव्हा तिला काही समजण्याआधीच वॉचमन तिच्या खोलीत होता, असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.
पीडितेने तिच्या मैत्रिणीला सांगितले की कनोजियाने तिला तिच्या खोलीत राहण्याची आणि तिला झोपण्याची परवानगी देण्याचा आग्रह धरला. हे ऐकताच मुलीला धक्का बसला आणि तिने त्याला तिथून निघून जाण्यास सांगितले. परंतु तो ऐकायलाच तयार नव्हता. अखेर मुलीने त्याला खोलीबाहेर ढकलल्यानंतर आणि त्याच्यावर ओरडल्यानंतर तो निघून गेला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस जेव्हा मुलीचा शोध घेत होते तेव्हा त्यांना तिच्या मैत्रिणींनी याबाबत माहिती दिली.
या संपूर्ण घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी हॉस्टेलवर गंभीर आरोप केला आहे. माझ्या मुलीने मला सांगितले होते की तिने तिच्या मैत्रिणीशी वॉचमॅनच्या छेडछाडीबद्दल चर्चा केली होती आणि त्यांनी तिच्या वॉर्डनरकडे जाऊन याबाबत तक्रार सुद्धा केली होती परंतु दुर्दैवाने त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. जर त्याचवेळी त्या वॉचमन वर काही कारवाई केली असती तर माझी मुलगी जिवंत राहिली असती, असं म्हणत मुलीचे वडिलांनी वॉर्डन आणि वसतिगृहाच्या अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, मुलीच्या वडिलांचे आरोप वसतिगृहाने फेटाळून लावले आहेत. वॉचमनची विरोधात कोणीही तक्रार केली नव्हती, जर काही तक्रार आली असती तर आम्ही त्याच्यावर त्याच्यावर कठोर कारवाई केली असती असं हॉस्टेल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे.