नवी दिल्ली । केंद्र सरकारने 2015 मध्ये सर्वसामान्यांसाठी अपघात विमा योजना सुरू केली. ज्याचे नाव पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आहे. या योजनेत वर्षाला केवळ 12 रुपयांच्या प्रीमियरवर दोन लाख रुपयांचे कव्हर दिले जाते. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल लोकांसाठी ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत विमा उतरवलेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला तर नॉमिनी व्यक्तीला किंवा त्याच्या कुटूंबाला विम्याची रक्कम दिली जाते. याशिवाय या योजनेंतर्गत अर्धवट अपंग होण्यासाठी 1 लाख रुपये दिले जातात. तर दुसरीकडे, पूर्णपणे अपंग होण्यावर विमाधारकाला सरकारकडून 2 लाख रुपयांची रक्कम दिली जाते.
क्लेम कसा करावा?
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेमध्ये क्लेम करण्यासाठी नॉमिनी व्यक्तीला बँक किंवा विमा कंपनीकडे जावे लागते. जेथे विमाधारकाद्वारे पॉलिसी खरेदी केली जाते. येथे नॉमिनी व्यक्तीला विम्याच्या रकमेचा क्लेम करण्यासाठी एक फॉर्म दिला जातो. ज्यामध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर, रुग्णालयाचा तपशील भरावा लागेल व सबमिट करावा लागेल. या व्यतिरिक्त आपण हा फॉर्म jansuraksha.gov.in वेबसाइटवरूनही डाउनलोड करू शकता. ही वेबसाइट हिंदी व इंग्रजी व्यतिरिक्त अनेक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे.
क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रे
जेव्हा पंतप्रधान विमा योजनेत नॉमिनी रकमेसाठी क्लेम करतात. तेव्हा त्याला फॉर्मसह काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील. ज्यात प्रामुख्याने डेथ सर्टिफ़िकेट किंवा डिसेबिलिटी सर्टिफ़िकेट असते.
पडताळणीनंतर मिळते पॉलिसीची रक्कम
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या दाव्यासाठी जेव्हा नॉमिनी व्यक्ती फॉर्मसह सर्व कागदपत्रे सादर करतील. मग संबंधित अधिकारी त्या कागदपत्रांची पडताळणी करतात. पडताळणी करताना आपण दिलेली सर्व माहिती योग्य आढळल्यास क्लेमची रक्कम फॉर्ममध्ये दिलेल्या खात्यात जमा केली जाते आणि अशाप्रकारे क्लेम सेट होतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.