हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Crisis : अमेरिकन बँकिंग सेक्टर सध्या मोठ्या गर्तेत सापडले आहे. ज्यामुळे अमेरिकेत गेल्या 2 आठवड्यांत 3 मोठ्या बँका बंद करण्याची वेळ आली. न्यूयॉर्क स्टेट फायनान्शियल रेग्युलेटर्सकडून SVB Financial Group आणि Silvergate Capital Corp नंतर आता सिग्नेचर बँक देखील बंद केली आहे. मात्र, फेडरल रिझर्व्हने SVB आणि सिग्नेचर बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या डिपॉझिट्सची रक्कम पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आश्वासन दिले आहे. या दोन्ही बँकांच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे काढया येतील, असेही फेडने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही वर्षांत आर्थिक अनियमिततेमुळे भारतातही अनेक बँकांची अवस्था बिकट झाली होती. त्यानंतर पाऊले उचलत रिझर्व्ह बँकेकडून पैशांच्या व्यवहारांवर बंदी घातली गेली होती. या घटनांमुळे आता आल्या सारख्या सर्वसामान्यांच्या मनात एकच प्रश्न घर करून बसला आहे तो म्हणजे जर बँक कोलमडली तर आपल्या पैशाचे काय होणार? Bank Crisis
सरकारकडून मिळते 5 लाखांपर्यंत गॅरेंटी
हे लक्षात घ्या कि, एखादी बँक दिवाळखोरीत निघाल्यास ठेवीदाराला एकमात्र दिलासा असतो तो म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशन अर्थात DICGC द्वारे दिलेले इन्शुरन्स कव्हर. आता DICGC अंतर्गत दिले जाणारे इन्शुरन्स कव्हर 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आले आहे. सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाले तर, ज्या बँकेच्या खात्यामध्ये आपले पैसे जमा असतील जर ती बँक बुडाली तर आपल्याला 5 लाख रुपये परत मिळतील, जरी खात्यात जमा केलेली रक्कम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असली तरीही. Bank Crisis
डिपॉझिट्स इन्शुरन्स अशा प्रकारे करेल काम
DICGC कडून दिले जाणारे कव्हर हे सर्व बँकांसाठी उपलब्ध असेल. मात्र, त्यांना यासाठी आधी नोंदणी करावी लागेल आणि विम्याचा हप्ता भरावा लागेल. DICGC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकेतील प्रत्येक ठेवीदाराचा बँकेचे लायसन्स रद्द केल्याच्या तारखेला किंवा विलीनीकरणाच्या किंवा पुनर्बांधणीच्या दिवशी त्याच्याकडे असलेल्या मुद्दल आणि व्याजाच्या रकमेसाठी जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरवला जातो. म्हणजेच आपली सर्व खाती एकत्र करून एकाच बँकेत कितीही पैसे जमा केलेले असले तरीही आपल्याला फक्त 5 लाख रुपयांचे इन्शुरन्स कव्हर मिळेल. यामध्ये मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम या दोन्हीचा समावेश असेल. Bank Crisis
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.dicgc.org.in/
हे पण वाचा :
Freedom 251 Scam : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन घोटाळ्याविषयी जाणून घ्या
Kotak Mahindra Bank कडून ग्राहकांना मोठा धक्का, कर्जावरील व्याज दरात केली वाढ
EDLI Scheme म्हणजे काय ??? जाणून घ्या त्याच्याशी संबंधित ‘या’ खास गोष्टी
Aadhar Card अपडेट करण्यासाठी 14 जूनपर्यंत द्यावे लागणार नाहीत पैसे, अशा प्रकारे करा अपडेट
Komaki LY Pro : दोन बॅटरी असलेली ‘ही’ गाडी एका चार्जमध्ये देते 180 किमी पर्यंतची रेंज, किंमत जाणून घ्या